You are currently viewing “सावरकरांची गौरव यात्रा नसून अपमान यात्रा”

“सावरकरांची गौरव यात्रा नसून अपमान यात्रा”

– शिवसेना युवानेते संदेश पारकर यांची नितेश राणेंवर जहरी टीका

महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा भाजपच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर काढली जात आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्याकडे सावरकर गौरव यात्रेची कोकणची जबाबदारी देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
संदेश पारकर म्हणाले, “भाजपचे आमदार नितेश राणे हे स्वाभिमान पक्षातून भाजपमध्ये गेल्यानंतर वीर सावरकरांच्या नावाने आता जिल्ह्यामध्ये गौरवयात्रा काढत आहेत. ज्यांनी वीर सावरकरांना माफिविर म्हणून हिणवल, वीर सावरकरांच व्यक्तिमत्व हे शर्मिलेल, लज्जास्पद व्यक्तिमत्व आहे, वीर पुरुषांचा अपमान करणारे आमदार नितेश राणे आता त्या ठिकाणी गौरव यात्रा काढतायेत.
“खरंतर हे लोकशाहीचं दुर्दैव आहे रानेंच सरड्यापेक्षा रंग बदलणारया पद्धतीने काम सुरू आहे. मुळ भाजप आणि जनता त्यांच्या नेतृत्वावर कधीही विश्वास ठेवणार नाही. ज्यांनी भारतीय जनता पार्टीला आयुष्यभर शिव्या दिल्या आणि वीर सावरकरांचा सतत अपमानच केला त्यांची गौरव यात्रा काढून जनतेची दिशाभूल करण्याचे काम नितेश राणे करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता खुळी नाही. ज्या पद्धतीने तुम्ही राजकारणामध्ये काम करताय त्या विरोधामध्ये जनता विरोधामध्ये आहे. म्हणून तुम्ही कितीही जिल्ह्यामध्ये गौरव यात्रा काढण्याचा प्रयत्न केला तरी ती गौरव यात्रा नसून ती सावरकरांची “अपमान यात्रा” असेल. भाजपचे हे नेतृत्व लोकांना वेटीस धरणार नेतृत्व आहे. आम्ही शिवसेना म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आणि आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कायम रस्त्यावर उतर, असे प्रतिपादन शिवसेनेचे युवानेते संदेश पारकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा