You are currently viewing उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात!

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात!

मुंबई :

अलिबाग येथील कार्यक्रमाला मुंबईवरुन जात असताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाला. तरी, बोटीवरील सर्वजण सुखरुप असल्याची माहिती मिळते आहे. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालील खांबाना जाऊन धडकली. सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही.

नंतर मात्र बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली. याआधी सुद्धा उद्योग मंत्री उदय सामंत यांची बोट भर समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यावेळी तटरक्षक दलाने रेस्क्यू ॲापरेशन करत भर समुद्रातून सुटका केली होती. त्यानंतर आज मांडवा जेट्टीजवळ बोटीला अपघात झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा