जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचा जिल्हा रुग्णालयावर भव्य मोर्चा
आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते,जान्हवी सावंत,नीलम पालव,मंदार शिरसाट मोर्चात सहभागी
रक्त पिपासु सरकारचा निषेध असो, रक्त पिपासु सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय,रक्ताचे दर कमी करा नाहीतर खुर्च्या खाली करा, बाजार मांडला रक्ताचा जीव जातो लोकांचा अशा गगनभेदी घोषणा देत रक्त पिशवी दरवाढी विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा युवासेनेच्यावतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज ओरोस येथील जिल्हा रुग्णालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.ओरोस म्हाडा ऑफिस ते जिल्हा रुग्णालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत,जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट मोर्चात सहभागी झाले होते.
शिंदे-फडणवीस सरकारने रक्तपुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू केले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात शासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशवीचा दर ४५० रुपये होता. आता हा दर ११०० रुपये करण्यात आला आहे.तर अशासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशवीचा दर १५५० रुपये करण्यात आला आहे. हे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने या दरवाढीविरोधात युवासेना आक्रमक झाली आहे. यावेळी रुग्णांची व्यथा मांडणारी प्रतिकृती साकारण्यात आली. तसेच घंटानाद करण्यात आला.
*याप्रसंगी आमदार वैभव नाईक म्हणाले,* रक्त पिशवीच्या दरात वाढ झाल्याने त्याविरोधात आवाज उठविण्याचे काम तुमच्या सारखा सामान्य शिवसैनिकच करू शकतो. हे आजच्या मोर्चाच्या उपस्थितीवरून दिसून आले. राम नवमीला एखाद्या मिरवणुकीत सहभागी झालं म्हणजे हिंदुत्व नाही, किंवा नवनीत राणांसारखी कुठेतरी हनुमान चाळीस वाचली म्हणजे हिंदुत्व होत नाही. जनसेवा हेच आमचे हिंदुत्व आहे. गरजवंतांची गरज पूर्ण करणे, ज्याला रक्ताची गरज आहे त्याला रक्त उपलब्ध करून देणे. आणि हे करत असताना हिंदू,मुस्लिम भेद न करणे हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे.उद्धवजींनी ज्या प्रमाणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची काळजी घेतली त्या पद्धतीने हे सरकार काम करताना दिसत नाही. कोरोना काळात उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयासाठी आरटीपीसीआर लॅब उपल्ब्ध करून मोफत तपासणी करण्यात आली. बेड उपलब्ध करून देण्यात आले. आपल्या छोट्याशा जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज उद्धवजींनी सुरु केले. त्यात आता दोन बॅच शिक्षण घेत आहेत. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी हे मेडिकल कॉलेज बंद पडू देणार नाही.असे आमदार वैभव नाईक यांनी ठणकावले.
*सतीश सावंत म्हणाले,* रक्त दरवाढी विरोधात महाराष्ट्रातील हे पहिले आंदोलन आहे. रुग्नाला जेव्हा रक्ताची गरज भासते तेव्हा शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावून जातात. समाजातील वेगवेगळया स्तरातून रक्तदान केले जाते. आणि हे मोफत घेतलेले रक्त ११०० रुपयांना विकून बाजार मांडण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे.
*संदेश पारकर म्हणाले,* गेले सात ते आठ महिने जनतेला सगळ्याच बाबतीत त्रास भोगावा लागत आहे. आरोग्य व्यवस्था बिघडली आहे. जिल्हयात डॉकटर उपलब्ध नाहीत,औषधे नाहीत.जिवनावश्यक वस्तुंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सातत्याने जनतेवर अन्याय करण्याचे काम मिंधे सरकारने केले आहे.रक्त पिशवीच्या दरात सरकारने वाढ केल्याने सर्वसामान्य लोकांना त्याचाही भुर्दंड सोसावा लागत आहे. आजारी माणसाला देखील लुटण्याचे काम सरकार करत आहे असे सांगितले.
संजय पडते म्हणाले, रक्त दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध करतो. १९८७ साली कुडाळ मध्ये मी स्वतः रक्तदान केले.त्यामुळे गरोदर महिलेचा जीव वाचला होता. आपण रक्त देऊन एखाद्याचा जीव वाचविण्याचे काम करतो. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला समाजकारणाचे बाळकडू पाजले आहे.आम्ही समाजकारणातून मोठे झाले आहोत. लोकांना मदत करणे हे शिवसैनिक आपले कर्तव्य समजतो.जोपर्यंत रक्ताचा दर पुन्हा ४५० रु होत नाही तोपर्यंत युवासेनेचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
*सुशांत नाईक म्हणाले,* सध्याचे सरकार रक्तपिपासू आहे.युवासेनेच्या माध्यमातून आम्ही रक्तदान करत आलो आहोत. अनेक सामाजिक संस्थाही रक्तदान शिबीरे घेतात. सामाजिक बांधिलकीतुन हे रक्तदान केले जाते.मग दान केलेल्या या रक्ताची किंमत करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला असा सवाल करत रक्त दरवाढ करणाऱ्या सरकराचा त्यांनी निषेध केला.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, विधानसभा प्रमुख सचिन सावंत, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, देवगड तालुका प्रमुख मिलिंद साटम, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके,नगरसेवक कन्हैया पारकर,शहरप्रमुख प्रमोद मसुरकर,युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवासेना वैभववाडी तालुकाप्रमुख अतुल सरवटे, युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर,फरीद काझी, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी,जिल्हा समन्वयक राजू राठोड,बाबू टेंबुलकर,छोटू पारकर, अवधूत मालणकर,हर्षद गावडे, बाळू मेस्त्री,सचिन आचरेकर, तेजस राणे, अनुप वारंग, जयेश धुमाळे,आदित्य सापळे,वैभव मालंडकर, सोहम वाळके,अनुराग सावंत, ललीत घाडीगावकर, गौरव हर्णे, रिमेश चव्हाण, सुदाम तेली, निसार शेख,विलास गुडेकर,सिद्धेश राणे, धनंजय सावंत, अमित राणे, गुरुनाथ पेडणेकर,राजू गवंडे, दिनेश नारकर,आनंद मर्गज,सुनील जाधव,प्रदीप गावडे,नागेश ओरोसकर,रवी कदम, निलेश राणे, उद्धव पारकर,सचिन सुतार, सुहास ठुकरुल,दर्शन मराठे, स्वरुपा विखाळे, वैदेही गुडेकर, काजल सावंत, योगेश मुंज, रोहित पावसकर, गणेश वाळके, संदीप गावकर,रवींद्र रावराणे,आदींसह युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.