सचिवपदी राजेश पराडकर; उपाध्यक्षपदी विरेश राऊत, प्रिया गावकर…
सावंतवाडी
येथील वकील संघटनेच्या अध्यक्षपदी नीता कविटकर यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी वीरेश राऊळ व प्रिया भावे-गावकर यांची निवड करण्यात झाली. ही निवड प्रक्रिया आज करण्यात आली. नव्या समितीचे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष परिमल नाईक व माजी अध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जाहीर करण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे सचिव राजेश पराडकर, खजिनदार स्वप्निल कोलगावकर, सहसचिव संतोष गावडे आदींचा समावेश आहे. तर सदस्य म्हणून अभिषेक चव्हाण, सायली दुभाषी आणि सुप्रीम परब यांना संधी देण्यात आली आहे.