You are currently viewing आनंदाचा शिधा अडकला संपात

आनंदाचा शिधा अडकला संपात

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित लेख*

*आनंदाचा शिधा अडकला संपात*

राजाला रोज दिवाळी. सागराला पाण्याची काय कमतरता. कोकीळेला सुरांची काय कमी. धनीकाला धनाची काय गरज. अशा पूर्वी लोकांनी काही वाकयप्रयोग सांगितलें आहेत याचा अर्थ असा होतो की ज्यांचे कडे आहे त्यांना त्यांची किंमत नाही. मग ते धान्य असो अन्न असो. कपडा असो. निवारा असो. यांना या गोष्टीची किंमत नाही.
कोणीही उपाशी पोटी राहू नये यासाठी प्रशासन सरकार कायम प्रयत्नशील असते त्यासाठी खरोखरच आर्थिक दुर्बल लोकांच्या साठी रेशन संकल्पना शासनाने अमलात आणली यामुळे स्वच्छ निर्भेळ. निवडक पौष्टिक. असे रेशन अन्न धान्य रास्त आणि स्वस्त दरात लोकांना मिळावं यासाठी शासन वेळोवेळी लाभार्थी लोकांचा सर्वे करत असते पण हा सुध्दा सर्वे सापेक्ष निःपक्ष पणे होत नाही. प्रत्येक जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी व कर्मचारी हे सर्वजण भ्रष्टाचार या शब्दाचा कळस केला आहे. खरोखरच लाभार्थी आजही यापासून वंचित आहेत. ज्यांना गरज नाही त्यांनाच रेशन अन्न धान्य दिले जाते आणि हे लोक बाजारात विकतात नाही तर जनावरांना खायला घालतात म्हणजे लोकांना पोटभर दोन वेळच जेवन मिळतं नाही आणि शासनाचा रेशन अन्न धान्य जात कुठ जनावरांच्या पोटात हा सर्व प्रकार पुढारी. नेते. खासदार आमदार मंत्री यांचे बगलबच्चे रेशन दुकानदार पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांच्या देखरेखीखाली चालतो. रेशन दुकानदार हा सुद्धा लोकांना नाहक त्रास देत आहेत. दुकान वेळेवर न उघडणे. धान्य रास्त वजन करून न देणे. युनिट प्रमाणे वाटप नाही. नाव दिसतं नाही. तक्रार पुस्तक उपलब्ध नाही. अशा विविध माध्यमातून लोकांची लूट केली जात आहे.
१४ मार्च रोजी सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलन पुकारले यामध्ये पुरवठा. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सुध्दा समावेश झाले होते. रेशन दुकानदार सुध्दा संपाच्या नावाखाली आपली दुकाने बंद करून बसले होते. सरकारने शासन निर्णय जारी करुन सुध्दा जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे यांनी संपात सहभागी होऊ नये तरीही हे लोक संपात सहभागी झाले होते त्यामुळे रेशन धान्य मिळण्यास लोकांना उशीर झाला त्यातच वर्षांचा गुढीपाडवा आला यावेळी गोरगरीब सर्वसामान्य लोकांना दोन घास गोड धोड मिळावे यासाठी शासनाने आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली आहे पण त्याचे वाटप न झाल्याने लोकांना खिशातील पैसे खर्च करून पुरणपोळी खावी लागली. या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या तोंडावर मारले गेले आहे. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी घरा-घरात केली जातेय. राज्यातील केशरी शिधापत्रिका धारक नागरिकांनाही पाडव्याचा आनंद साजरा करता यावा, यासाठी सरकारच्या वतीने आनंदाचा शिधा योजना घोषित करण्यात आली होती. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयात चार महत्त्वाच्या वस्तू केशरी आणि पिवळी शिधा पत्रिका धारकांना देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र गुढीपाडवा उद्यावर येऊन ठेपला तरीही राज्यातील बहुतांश रेशनच्या दुकानांवर आनंदाचा शिधा मिळत नाहीये. त्यामुळे रेशनच्या दुकानांवर पोहोचलेल्या नागरिकांची निराशा होतेय. असंख्य नागरिक रिकाम्या हाताने घरी पोहोचत आहेत. विरोधकांनी यावरून सरकरावर जोरदार टीका सुरु केली आहे.
खालील प्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आनंदाच्या शिधा मधून वाटप केले जात आहे. केशऱी कार्ड धारक अर्थात शिक्षापत्रिका धारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर तसेच 1 लीटर पामतेल असा आनंदाचा शिधा मिळणार आहे. गुढीपाडव्यापासून पुढील 1 महिनाभर ही योजना सुरु राहील. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच सांगली. कोल्हापूर विभागातील सर्व आणि सातारा. विभागातील अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात हा शिधा दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.
आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे प्रक्रिया सुरु केली जाईल. तसेच 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279रुपये प्रति संच या दरानुसार 455कोटी 94लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17  कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली
सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेत असून आनंदाचा शिधा वितरण या निर्णयामुळे सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे, असा विश्वास आणि असे सार्थ मत गोरगरीब लोकांच्या मधून व्यक्त केले जात आहे.
सांगली मधील 100 फुटी रोड येथील शासनमान्य रास्त भाव दुकान येथे पात्र लाभार्थीना आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे. आनंदाचा शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेलाचा समावेश असून प्रतिसंच मात्र 100 रूपये या सवलतीच्या दराने पात्र मिळणार आहे. शिधा गुढी पाडव्यापासून एक महिन्यात वितरीत केला जाणार आहे.
सांगली जिल्ह्यात एकूण 1361 रेशन दुकानदार पैकी  389 रेशन दुकानदारापर्यत शिधा पोचला आहे
उद्यापर्यंत 70 टक्के शिधा पोचवला जाईल असं पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलेय
एकूण मंजूर शिधावस्तू-1650704
एकूण प्राप्त शिधावस्तू-1220622
एकूण अप्राप्त शिधावस्तु-४३०००८पाडव्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शासनाने आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली, पण तो प्रत्यक्षात पाडव्यानंतरच मिळणार आहे. शासनाने यासाठीच्या निविदा दोनच दिवसांपूर्वी निश्चित केल्या आहेत, त्यामुळे पाडव्याला स्वखर्चानेच पुरणपोळी करावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. गरीब कुटुंबांना १०० रुपयात गोडतेल, रवा, चणा डाळ, साखर मिळणार आहे. दिवाळीला घरोघरी आनंदाचा शिधा पोहोचल्याने आता पाडव्यासाठीही सर्वसामान्यांचे डोळे त्याकडे लागले आहेत. पण पाडवा अवघ्या तीन दिवसांवर आला, तरी शिध्याचा पत्ता नाही. दुकानात तर राहू देच, पण जिल्ह्यातही आलेला नाही. किंबहुना राज्यात कोठेच त्याचा पत्ता नाही. शासनाने घोषणा केली, तरी त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. त्यातच सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचेही विघ्न येऊन ठेपले. त्यामुळे शिधा लांबणार हे निश्चित झाले आहे. शासनाने शिध्यासाठीची निविदा प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पूर्ण केली. ठेकेदार निश्चित झाल्यानंतर आता शिध्याचे पॅकिंग, कदाचित त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांची छपाई, तेथून जिल्हा गोदामांत पुरवठा अशी प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
दिवाळी. गुढीपाडवा. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती या वेळी हा आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे पण अजूनही सांगली जिल्ह्यातील कुठेच गुढीपाडव्याचा आनंदाचा शिधा वाटप झालेले नाही.या वाटपास उशीर ज्यांच्यामुळे झाला आहे ज्यांनी संपाच्या नावाखाली गोरगरीब सर्वसामान्य लोकाची गैरसोय केली आहे त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. आणि लवकरात लवकर आनंदाचा शिधा वाटप करण्यात यावा.
सरकारने गोरगरीब सर्वसामान्य लोकांसाठी मोफत रेशन धान्य ही संकल्पना आणली आहे पण या योजनेमुळे लोकांच्यात आनंदाचे वातावरण आहे पण रेशन दुकानदार यांच्यावर कमिशन न मिळणे. भ्रष्टाचार करता न येणे. ही विज कोसळली आहे त्यामुळे जिल्ह्यातील काही रेशन दुकानदार यांनी महिन्याचे काही ठराविक दिवशी धान्य वाटप करत आहेत. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. शासनाने मोफत वाटप करण्यात येणारे रेशन अन्न धान्य बंद करावे आणि ३/२/ किलो प्रमाणे मागिल त्याला धान्य विकत धया मोफतच धान्यच बंद करा. कोरोना काळात सांगली जिल्ह्यातील ९३ रेशन दुकानदार यांचा परवाना रद्द करण्यात आला होता पण कागदावरच आणि ती दुकानं पुन्हा आहे तसाच बोगस भ्रष्टाचार करतंच आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे मागिल त्याला रेशन दुकान ही संकल्पना सरकारने अमलात आणणे गरजेचे आहे. ज्या रेशन दुकानदार यांच्याबद्दल तक्रार दाखल होईल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी त्याच्याकडं असणारे रेशन दुकान काढून घेण्यात यावे.
गृहभेट देऊन पात्रं आणि अपात्र रेशनकार्ड धारकांचा सर्वे झालाच पाहिजे. प्रत्येक तालुक्यातील पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांनी दिवसभर कार्यालयात एसी मध्ये न बसता आपल्या तालुक्यातील शिधापत्रिका धारकांचा घर टु घर सर्वे करायला हवा. त्यामध्ये * शिधापत्रिका धारक त्याच गावचा रहिवासी आहे का?? त्यांच्या घरात सरकारी नोकरी ‌. पेन्शन धारक कोण आहे कां?? त्या शिधापत्रिका धारकांच्या घरांत कर्ती व्यक्ती. मुल. मुली. महिला. वयोवृद्ध लोक. गंभीर आजारी लोक. विधवा महिला. असे कोण आहे कां?? शिधापत्रिका धारक यांच्या नावावर शेती आहे कां?? शिधापत्रिका धारका यांचें घर साध. आर सी.सी प्रकारचें एक हजार स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त आहे कां?? त्या शिधापत्रिका धारकांना रेशन अन्न धान्य याची गरज आहे कां?? शिधापत्रिका धारकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे कां?? असा सर्वे २००५ साली आर्थिक निहाय सर्वे करण्यात आला होता तोही बोगस झाला होता वरीलप्रमाणे सर्वे करण्यासाठी शासनाकडे माणूस बळ नसेल तर आजही प्रामाणिक पणे काम करणार्या संस्था आजही आहेत त्यांना नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात यावी.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

 

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा