You are currently viewing “पे अँड पार्किंग” चा किल्ले विजयदुर्ग परिसरात शुभारंभ

“पे अँड पार्किंग” चा किल्ले विजयदुर्ग परिसरात शुभारंभ

देवगड :

 

आज पासून “पे अँड पार्किंग” किल्ले विजयदुर्ग परिसरात सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि किल्ले विजयदुर्ग समिती यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून या सेवेच्या माध्यमातून निर्माण झालेली रक्कम ही पर्यटन सुविधासाठी वापरली जाणार आहे. कोल्हापुर येथील सागर कुलकर्णी यांच्या हस्ते आज याचे उद्घाटन करण्यात आले.

पर्यटकांच्या पार्किंग व्यवस्थेमधून मिळणारा पैसा त्यांच्या पर्यटन सोयरेसाठी वापरला जाणार असल्याचे प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी सांगितले. सध्या जेष्ठ पर्यटकांना विसावा घेण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी हनुमान मंदिराजवळ पर्यटक विसावा केंद्र चालू करण्यात आले असून यामध्ये शौचालय, बाथरूम, पाण्याची व्यवस्था, आराम खुर्ची, पंखे आदी सुविधा मोफत ठेवण्यात आल्या आहेत.

भविष्यात या विसावा केंद्रामध्ये कोकणची संस्कृती, किल्ल्याचा इतिहास आदींच्या ध्वनिफिती दाखवण्यात येणार आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या सहकार्याने महिला व पुरुषांसाठी किल्ल्याच्या पायथ्याशी संडास आणि मुतारीची व्यवस्था करण्यात आली आहे. या उद्घाटनाला सरपंच रियाज काझी, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू परुळेकर, अध्यक्ष प्रसाद देवधर, उपाध्यक्ष शरद डोंगरे, सचिव बाळा कदम, प्रदीप मीठबावकर, प्रदीप साखरकर, यशपाल जैतापकर, रविकांत राणे आदी तसेच समितीचे सदस्य तसेच दिनेश जावकर, केतन घरकर, स्टीफन फर्नांडिस उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा