You are currently viewing स्वराज्य सरपंच सेवासंघ जिल्ह्याध्यक्षपदी प्रवीण गवस

स्वराज्य सरपंच सेवासंघ जिल्ह्याध्यक्षपदी प्रवीण गवस

दोडामार्ग

स्वराज्य सरपंच सेवा संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सोनावल मधील प्रवीण नारायण गवस यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच त्यांना प्रदान करण्यात आले आहे. अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. “गाव खेड्यांचा विकास हाच सरपंच संघटनेचा ध्यास” हे या संघाचे ब्रीदवाक्य आहे. ग्रामपंचायत स्तरावरील प्रवीण गवस यांचे कार्य पाहून ही निवड करण्यात आली आहे. ही निवड दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा