मालवण
शासनाकडून आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक करण्याच्या सूचनेनंतर सर्वसामान्य जनतेत गोंधळ उडाला असून ही दोन्ही कार्ड लिंक आहेत की नाही हे तपासण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. सर्व सामान्य जनतेची ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते विशाल ओटवणेकर यांच्यावतीने आधार व पॅन कार्ड लिंक याची मोफत तपासणी करण्याचे शिबीर मालवण पंचायत समिती लगतच्या विशाल हॉटेल येथे दि. २ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
खेड्या- पाड्यातील लोकांना तसेच सर्वसामान्य जनतेला आधार व पॅन कार्ड लिंक करणे काय असते ? ते कसे करावे ? याची माहिती कोणाकडून पुरवली जात नाही. तसेच ते तपासण्यासाठी पैसेही मोजावे लागत आहेत. या शिबिरात नागरिकांनी सहभागी होऊन आपले आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन विशाल ओटवणेकर यांनी केले आहे.