You are currently viewing वेंगुर्ला येथील महिलांकडून मंदिरांमध्ये रामरक्षा स्तोत्र पठण व नामस्मरण…

वेंगुर्ला येथील महिलांकडून मंदिरांमध्ये रामरक्षा स्तोत्र पठण व नामस्मरण…

वेंगुर्ले

गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंतच्या नवरात्रात वेंगुर्ला येथील महिलांनी वेंगुर्ला शहरातील वेगवेगळ्या मंदिरात श्री रामरक्षा स्तोत्र पठण व नामस्मरण केले. शेवटच्या दिवशी भाऊ मंत्री यांच्या रामम़ंदिरात रामरक्षा स्तोत्र पठण व नामस्मरण केले.याच दिवशी हिंदु धर्माभिमानी नागरिक तर्फे दुसरी ते चौथी गटासाठी मारुती स्तोत्र पठण व पाचवी ते सातवी गटासाठी रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४५ मुले सहभागी झाली होती. या स्पर्धेचे लहान गटाचे परिक्षण रत्नप्रभा साळगांवकर व अजित राऊळ यांनी केले. व मोठ्या गटाचे परिक्षण सुषमा प्रभू खानोलकर यांनी केले.विजेत्या मुलांना हायटेक काॅम्प्युटर कडून गणेश अंधारी यांनी रोख पारितोषिके दिली.तसेच सर्व सहभागी मुलांना ओम योग साधना संचलिका साक्षी बोवलेकर व सुषमा प्रभू खानोलकर यांनी बक्षिसे दिली. भाऊ मंत्री यांनी सर्व उपस्थित साधक महिला व मुलांना अल्पोपहार दिला.

यावेळी अरुण गोगटे, रवि परब, सुहास गवंडळकर, प्रसन्ना देसाई, मंदार बागलकर उपस्थित होते व सन्माननीय नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम खुप उत्साहात साजरा झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा