*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम लेख*
*राम…!*
मी राम…हो, बरोबरच ऐकलंत तुम्ही…
मी रामच बोलतोय…आज राम नवमी, बरोब्बर दुपारी बारा वाजता माझ्या जन्मवेळी तुम्ही माझा जन्मदिवस साजरा करता…’राम जन्मला ग सखे, राम जन्मला’ हे गीत आवर्जून गाता…
तुमच्या सर्वांच्या मुखावरील आनंद, तो प्रसादाचा सुंठवडा एकमेकांना देतांनाचा प्रासादिक भाव…सारं सारं कसं माझ्या मनाला सुखावून जातं…
पण तेच तुम्ही…माझ्या प्रिय पत्नीची- सीतेची काही चूक नसतांना मी तिला करायला सांगितलेलं अग्नी दिव्य ते निर्दोष असतानाही गर्भवती अवस्थेत तिला वनात सोडणं आणि नंतर तिच्या भूमिगत होण्यासाठी कारण होणं या सर्वांबद्दल अप्रत्यक्षपणे मला दोषी धरता…तेव्हा वाटलं आपलं मन मोकळा करण्यासाठी आजच्या एवढा चांगला दिवस कुठून लाभणार…
तर प्रिय भक्तांनो…माझ्या अवतारा नंतर कैक वर्षांनी लिहिल्या गेलेल्या गीत रामायणातील ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’ हे गीत तुम्ही नेहमीच ऐकत असता, त्या गीतातील शब्द न् शब्द मानवी जीवनाला लागू पडतात.
मी विष्णूचा अवतार जरी मानला गेलो तरीही राम म्हणून मी त्या जन्मात एक मानव होतो. त्यामुळे सर्व मानवी भावभावना आणि कर्तव्यं याची मला जाणीव होती. पण त्याशिवाय मी एक राजपुत्र आणि नंतर राजाही होतो.
राजाच्या डोक्यावरील मुकुट काटेरी असतो असं म्हणतात. ते सर्वार्थाने खरं आहे, म्हणूनच पती, पुत्र, भ्राता इत्यादी कौटुंबिक नाती निभावतांना राजधर्म पाळण्यासाठी मात्र मला माझ्या मनाशीच युद्ध करावं लागलं. जे रावणाशी केलेल्या दृश्य युद्धापेक्षाही भीषण होतं आणि ज्यात माझाच पराभव झाला होता.
कारण ज्या नाजूक, सुंदर, कोमलांगी सीतेला मी स्वयंवरात अवजड शिव धनुष्य पेलुन जिंकून आणले होते, ज्या माझ्या पत्नीवर- मी प्राणांपलिकडे प्रेम करीत होतो, त्याच सीतेला मी दोनदा अग्निदिव्य करायला लावलं. ती गर्भवती असतांना तिला वनवासात पाठवलं. आमचं दोघांचंही एकमेकांवर नितांत प्रेम असतांना तिनं मी सांगितलेल्या प्रत्येक आज्ञेचे पालन करून ते सिद्ध केलं. माझं प्रेम मात्र राजकर्तव्यात झाकोळुन गेलं. हा माझ्या प्रेमाचा पराभवच नव्हे काय!
माझे दोन पुत्र लवकुश…राजपुत्र असून त्यांना वनात जन्म घ्यावा लागला, वाढावे लागले…आणि ‘पुत्र सांगती चरित्र पित्याचे’…’परि पिता न ओळखू शके त्यांसी’ अशी माझी स्थिती…एकंदरीत पुत्रधर्म निभावण्यासाठी वनवासात गेलो आणि पित्यालाच गमावून बसलो, पतीधर्म पाळण्यासाठी पत्नीच्या मना- शरीराला वेदना द्याव्या लागल्या, आणि पित्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी माझे पुत्रच माझ्याजवळ नव्हते, आणि जेव्हा ते भेटले तेव्हा मला पत्नीच्या चिरविरहाचे आणि त्यांना मातृवियोगाचे दुःख सहन करावे लागले हे माझे दुर्भाग्यच नव्हे काय!
भक्तांनो…मी रामायणातील सर्वच घटना सांगणार नाही. कारण त्या तुम्हाला अगदी पाठ झालेल्या आहेत. तुम्ही वारंवार रामकथेचे पारायण करत असता…पण माझा अवतारच ज्या कारणांसाठी झाला होता त्याला सुसंगत अशीच कारणं निर्माण केल्या गेली, कारण ते विधीलिखितच होतं. त्यामुळे मंथरा, कैकयी माता, रावण किंवा अगदी परिट सुद्धा…कोणाकोणालाच दोष देणं योग्य नाही.
पण त्रेतायुगापासून आत्ताच्या कलियुगापर्यंतही तुमच्या मनामनातील माझं स्थान अढळ आहे. तुम्ही सहजतेने, संघर्ष करूनही माझी भव्य- अतिभव्य मंदिरं बांधत आहात, उत्तम राज्यकारभाराला रामराज्य संबोधत आहात, माझ्या एकपत्नीत्वाचं, बंधुप्रेमाचं गुणगान गाता आहात…ठायी ठायी अनेक उदाहरणांसाठी तुम्ही माझं नाव घेत असता, अंतिम समयीही ‘राम नाम सत्य आहे’ म्हणत असता…
खूप छान वाटतंय. पण भक्तांनो! एक सांगू का? भ्रष्टाचारमुक्त रामराज्य प्रत्यक्षात येण्यासाठी तसे मनापासून प्रयत्न केलेत, परस्रीचा सन्मान केलात, निस्वार्थ वृत्तीने सर्व नाती सांभाळलीत, मी रावणाशी एकदाच युद्ध करून त्याला संपवलं, तुम्ही दरवर्षी त्याचं प्रतीक म्हणून दसऱ्याला रावण दहन करता, पण मनामनातला रावण…तो तर अजूनही जिवंत आहे, त्याला नष्ट केलंत तर मला जास्त समाधान वाटेल.
चला, रामजन्माचा उत्सव संपला…माझं मनोगतही आवरतं घेतो…रामराज्य निर्माण करण्यात यशस्वी व्हा…पुन्हा कधी तरी भेटु…
भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334
३०-३-२३
*संवाद मीडिया*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————