You are currently viewing माडखोल येथील श्री साई मंदिरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा…

माडखोल येथील श्री साई मंदिरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा…

सावंतवाडी

माडखोल-तांबळवाडी येथील ह श्री साई मंदिरात आज रामनवमी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी दुपारी बारा वाजता भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा व त्यानंतर आरती व साई भंडारा संपन्न झाला.

श्री साई वात्सल्यधाम येथे २९ ते ३१ मार्च या कालावधी वर्धापन दिन, राम नवमी उत्सव व साई दत्त याग सोहळा असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज रामनवमीनिमित्त मंदिरात सकाळपासून दुपारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी आरतीचा मान ब्रेकिंग मालवणीचे संपादक आणि डिजिटल मीडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर यांना मिळाला. तर सायंकाळच्या सत्रात भक्ती गीत कार्यक्रम, सांज आरती आणि रात्री पालखी सोहळा संपन्न होणार आहे, तरी या उत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री साई वात्सल्यधाम ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा