You are currently viewing रामराज्य

रामराज्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*रामराज्य ….?*

रामराज्य रामराज्य कशी वाटते कल्पना
सुखी होती प्रजा पण सुखी होत्या का हो सुना?
राम राम करतच देह ठेवतो दशरथ
वनवासात सोडतो सीता राजाचा तो रथ…

राजघराण्याची सुन लेक जनकाची गोड
तिच्या साठी बनले हो जीवनच एक कोडं
तिच्या सासवा दु:खात तिच्या बहिणी दु:खात
सांगा होते का हो सुख सांगा रामाच्या राज्यात?

जनअपवाद कोणी मुर्खासारखे बोलतो
अब्रू जानकीची पहा काट्यावरती तोलतो
दिली पाठवून वनी गर्भार ती सुकुमारी
काटे तोडत संसार पोटासाठी ती उभारी…

राजघराण्यात कुणा नाही मिळाले हो सुख
सारे पिचले दु:खात तापून ते झाले मूक
रावणाच्या राज्यात हो वृक्ष अशोकाच्या खाली
आसवांत न्हात न्हात उन्हातान्हात तापली…

लंका पराभूत केली अग्निदिव्य जानकीला
काय मिळाले हो सुख सांगा महान राणीला
दुभंगली धरणी नि तिने घेतले पोटात
दु:ख सारेच घेऊन गेली बंद त्या ओठात …

नारी साठी फक्त दु:ख युगे सांगतात सारी
रामराज्य असो दुजे तुझ्यासाठी फक्त “आरी”
नाही मिळणार न्याय राम असो असो कुणी
बाई तुझ्यासाठी आहे सदाचीच आणिबाणी ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २८ मार्च २०२३
वेळ: रात्री ११/३९

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा