कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील तेंडोली- खरावतेवाडी येथील देव वावळेश्वर हनुमान सेवा मंडळातर्फे तेथीलच वावळेश्वर मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त १ ते ६ एप्रिल या कलावधीत दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी भावई दशावतार मंडळा (कुणकेरी) चे नाटक, २ रोजी नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळा (मोचेमाड) चे नाटक, ३ रोजी ..हेळेकर दशावतार मंडळा (कारिवडे) चे नाटक, ४ रोजी अमृतनाथ दशावतार मंडळा (म्हापण) चे नाटक, ५ रोजी नवोदित दशावतार मंडळा (माड्याचीवाडी) चे नाटक… हे सर्व दशावतारी नाट्यप्रयोग रोज रात्री ८.३० वाजता
सुरु होतील. ६ रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्म सोहळा. यानिमित्त रमेश प्रभू यांचे कीर्तन, दुपारी ३ वाजता सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ५ वाजता रामकृष्ण महिला मंडळा (तेंडोली) च्या बुवा हर्षदा थोरबोले व जुई राऊळ यांचे भजन, ७ वाजता महाआरती, रात्री पालखी प्रदक्षिणा, १० वाजता वावळेश्वर दशावतार मंडळा (तेंडोली) चे नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन देव वावळेश्वर हनुमान मंडळ, तेंडोलीने केले आहे.