मालवण
आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान येथे रामनवमी उत्सवास सुरुवात झाली असून दिवसेंदिवस उत्सवाची रंगत वाढू लागली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने संगीत प्रेमीना संगीताच्या मेजवाणीचा आनंद लुटता येणार आहे. इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरात उत्सवाच्या निमित्ताने 29 ते 31रोजी संगीत मैफिल रंगणार आहे
बुधवार दिनांक 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता श्री भाग्येश मराठे यांचे शास्त्रीय गायन(पंडित राम मराठे यांचे नातू ) होणार आहे. यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर, वरद सोहनी यांची राहणार आहे. गुरुवार 30 मार्च रामनवमी दिवशी संध्याकाळी 6 वाजता शुक्रवार 31 मार्च सकाळी 10 वाजता निराली कार्तिक यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. या संगीत मैफिलीचा लाभ घेण्याचे संस्थांनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे