You are currently viewing हिंदळे येथील दिंडी भजन स्पर्धेत तोरसोळे मंडळ प्रथम

हिंदळे येथील दिंडी भजन स्पर्धेत तोरसोळे मंडळ प्रथम

देवगड :

 

देवगड तालुक्यातील श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ, हिंदळे भंडारवाडा यांच्या वतीने गुढीपाडवा मांडानिमित्त आयोजित दिंडी भजन स्पर्धेत आई भवानी कलादिंडी तोरसोळे मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष परेश खोत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक विठ्ल रखुमाई भजन दींडी मंडळ आचरा, तृतीय क्रमांक श्रीगणेश दींडी भजन मंडळ, मालवण तर उत्तेजनार्थ क्रमांक श्री गांगोरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोयरे यांनी मिळविला. परीक्षण देवदत्त पुजारे (मुणगे), तुळशीदास मेस्त्री (हिंदळे), सदानंद कुंभार (हिंदळे) यांनी केले.

प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे १० हजार, सात हजार, तीन हजार तर उतेजनार्थ दोन हजार रुपयांचे पारितोषिक व प्रत्येकी चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. उद्घाटन व बक्षीस वितरण प्रसंगी सरपंच मकरंद शिंदे, अध्यक्ष परेश खोत, देवदत्त पुजारे, प्रशांत खोत, कमलाकर मयेकर, मंगेश मयेकर, विजय शेटये, समीर हळदणकर, मनोज जाधव, बबन शेटये, अनिकेत हिंदळेकर, किरण हळदणकर, योगेश पाटील, दयानंद तेली, मंगेश मयेकर,समील हळदणकर, भाई मांजरेकर, दीप्ती खोत, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा