You are currently viewing मालवण-ओझर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

मालवण-ओझर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

मालवण

ओझर येथे आंब्याच्या झाडास निलेश गोविंद तोंडवळकर (वय-४२ रा. तोंडवळी वरची) या तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ओझर रस्त्यालगत असणाऱ्या आंब्याच्या झाडाला एका तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत स्थानिकांना तसेच अन्य दुचाकीस्वारांना दिसला. हा मृतदेह निलेश तोंडवळकर यांचा असल्याचे समजताच त्यांचा भाऊ गणेश तोंडवळकर ग्रामस्थांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, हेमंत पेडणेकर, सुभाष शिवगण, सुशांत पवार आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

निलेश तोंडवळकर हे आज सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ते स्थानिकांना ओझर येथून दुचाकीवरून जाताना दिसले. ओझर हायस्कूलच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी आपली दुचाकी लावलेली दिसून आली. १० वाजण्याच्या सुमारास ओझर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना, स्थानिक ग्रामस्थांना आंब्याच्या झाडास त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा