You are currently viewing महाविकास आघाडीच्यावतीने गांधीचौक कुडाळ येथे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ तर मोदी सरकार निषेधार्थ आंदोलन

महाविकास आघाडीच्यावतीने गांधीचौक कुडाळ येथे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ तर मोदी सरकार निषेधार्थ आंदोलन

कुडाळ

महाविकास आघाडीच्यावतीने गांधीचौक कुडाळ येथे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आणि मोदी सरकार व भाजपच्या निषेधार्थ गांधीचौक कुडाळ येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी *राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है* *मोदी सरकार हाय हाय* *मोदी सरकार हटाव देश बचाव* *चोरोको चोरही कहेंगे तानाशाहसे नही डरेंगे* *आदानी मोदी भाई भाई मिलकर खाई देशकी मलाई* *नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी* *राहुल गांधींची खासदारकी रद्द करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो* अशा अनेक घोषणांनी परीसर दणाणून सोडला. यावेळी आमदार वैभव नाईक, इर्शाद शेख,अमित सामंत, संदेश पारकर, संजय पडते, प्रवीण भोसले यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना व जनतेला संबोधित केले.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,संदेश पारकर,काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, मा. मंत्री प्रविण भोसले,महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू,सेवादल काँग्रेस अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, ओबीसी काँग्रेस अध्यक्ष महेश अंधारी, कुडाळ नगराध्यक्षा आफ्रिन करोल, काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, महिला प्रदेश सदस्या विभावरी सुकी,वैभववाडी पंचायत समितीच्या मा. सभापती मीनाताई बोडके, वेंगुर्ला पंचायत समिती माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, वेंगुर्ला पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश परब,काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर,प्रवीण वरूनकर,अ‍ॅड. राघवेंद्र नार्वेकर, सुंदरवल्ली पडीयाची, अक्षता खटावकर, रंजना जळवी, शुभांगी काळसेकर, सोनल सावंत, सुमेधा सावंत, माया चिटणीस, संदिप सुकी,अस्लम खतीब, वसंत नाटेकर,पुंडलिक दळवी, काका कुडाळकर,अतुल बंगे, रुपेश पावस्कर,तबरेज शेख, तौसीफ शेख, समीर वंजारी, विजय खाडे, उत्तम चव्हाण, मयूर आरोलकर, निलेश मालंडकर,अजय मोर्ये इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा