You are currently viewing दोडामार्गातील “फरा” प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…

दोडामार्गातील “फरा” प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…

दोडामार्ग

तालुक्यातील केर गावातील आदर्श शिक्षक कै. फटीराव रामचंद्र देसाई यांच्या “फरा” प्रतिष्ठानचे १२ व्या वर्षातील पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कारांचे वितरण २ मे रोजी संध्याकाळी ५:३० वा. केर येथील श्री देव पूर्वाचारी सभामंडपात करण्यात येणार असल्याची माहिती फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ऍड. सोनू गवस, निवृत्त कृषी विस्तार अधिकारी रामा ठाकूर, ग्रामसेवक संदीप पाटील, सहकार तज्ज्ञ गजानन सावंत उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले , विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना गेल्या अकरा वर्षांपासून पुरस्कार देण्यात येत आहेत. यावर्षीचे पुरस्कार असे: आदर्श शिक्षक फरा पुरस्कार वंदना नारायण राणे ( शाळा कणकवली नं. 2 , ता. कणकवली ), अध्यापन भास्कर फरा पुरस्कार स्नेहल सदाशिव गवस ( मुख्याध्यापिका श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे, ता. दोडामार्ग ), आदर्श पत्रकारिता फरा पुरस्कार अभिमन्यू लोंढे ( दैनिक लोकसत्ता व रत्नागिरी टाइम्स ), स्नेहा विष्णू स्मृती नाट्य रंगकर्मी फरा पुरस्कार शिवप्रसाद उर्फ शिवा मेस्त्री ( दत्तमाऊली पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग ), सौ. हेमावती स्मृती महिला स्वावलंबन फरा पुरस्कार श्रीमती अर्चना अच्च्युत आसोलकर ( आसोली ता. वेंगुर्ला ), आरोग्यसेवा फरा पुरस्कार डॉ. गोविंद शिवराम उर्फ दाजी देसाई ( श्रीशिवशैलजा क्लिनिक कोलझर, ता. दोडामार्ग ), स्मार्टग्राम फरा पुरस्कार ग्रामपंचायत निरवडे ता. सावंतवाडी, ( सरपंच सुहानी सुहास गावडे ), आदर्श कृषिरत्न फरा पुरस्कार शिवप्रसाद काशिनाथ देसाई ( मु. पो. बांदा, ता. सावंतवाडी ) आदर्श पत्रकारिता युवा प्रेरणा फरा पुरस्कार प्रवीण वामन परब ( पत्रकार दै. प्रहार, मु. मडुरा, ता. सावंतवाडी ), संगीता शामसुंदर स्मृती आदर्श संगीत सेवा फरा पुरस्कार विश्वासराव फक्रोजी देसाई ( मु. पो. कळणे, ता. दोडामार्ग ), शैला स्मृती आदर्श दिव्यांग प्रेरणा फरा पुरस्कार दशरथ परशुराम देसाई ( मु. पो. केर, ता. दोडामार्ग ), आदर्श भजनीसेवा फरा पुरस्कार शुभम संतोष कोरगावकर ( मु. पो. आयनोडे पुनर्वसन, ता. दोडामार्ग ), आदर्श ग्रामसेवा फरा पुरस्कार उदय लवू आईर ( आदिवासी कातकरी समाजासाठी कार्य, मु. पो. कुसगाव, हिर्लोक, ता. कुडाळ ), अत्यंत महत्वाचा व प्रतिष्ठेचा जीवनगौरव फरा भूषण पुरस्कार चंद्रकांत उर्फ कांता मेस्त्री, मु. पो. ओटवणे, ता. सावंतवाडी ) तर नागेश्वर बळीराम रामोड ( तलाठी, सजा कोनाळ ), कृष्णा कुंभार ( मूर्तिकार, झरेबांबर ), श्रीमती संयोगीता वाडकर ( घोटगेवाडी अंगणवाडी सेविका ) यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास शिवशंभू चरित्र व्याख्याते पुणे येथील हभप धर्मराज महाराज हांडे, माजी नगरसेवक तथा शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिकेचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक चराठेचे कार्याध्यक्ष अच्च्युत सावंतभोसले, सिंधुमित्र प्रतिष्ठान सावंतवाडीचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत, विद्युत पारेषण रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता प्रवीण परब, तहसीलदार अरुण खानोलकर, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, दोडामार्ग गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार निवडीसाठी प्रेमानंद देसाई, ऍड. पी. डी. देसाई, ऍड. सोनू गवस, रामा ठाकूर, तेजस देसाई, संतोष देसाई, रत्नदीप गवस, अमित दळवी , संदीप पाटील यांनी काम पाहिले. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुस्तक, पुष्प, फरा प्रतिष्ठान लोगो, सन्मानपत्र, सन्मानचित्र असे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा