You are currently viewing शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ ‘सुटा’ सांगली जिल्हा अध्यक्षपदी प्रा.(डाॅ.)निवास वरेकर यांची आणि उपाध्यक्ष पदी डॉ. एस. के. माने यांची बिनविरोध निवड

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ ‘सुटा’ सांगली जिल्हा अध्यक्षपदी प्रा.(डाॅ.)निवास वरेकर यांची आणि उपाध्यक्ष पदी डॉ. एस. के. माने यांची बिनविरोध निवड

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ ‘सुटा’ सांगली जिल्हा अध्यक्षपदी प्रा.(डाॅ.)निवास वरेकर यांची आणि उपाध्यक्ष पदी डॉ. एस. के. माने यांची बिनविरोध निवड

सांगली :

सन २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षांकरिता शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) सांगली जिल्हा शाखेची वार्षिक सभा सांगली येथे सुटा कार्यालयात पार पडली.या दोन वर्षांकरिता पदाधिकारी निवडी पार पडल्या. आदर्श काॅलेज, विटा येथील इतिहास विभाग प्रमुख व विद्यमान शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.(डाॅ.)निवासराव वरेकर यांची अध्यक्षपदी तर कार्यवाह( सेक्रेटरी) म्हणून पी.डी.व्ही.पी.महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख, प्रा.जे.ए.यादव यांची निवड झाली.खजिनदारपदी कन्या महाविद्यालय, मिरज येथील प्रा.बी.एम.सरगर यांची निवड झाली.उपाध्यक्ष म्हणून के.बी.पी.काॅलेज, इस्लामपूरचे भूगोल विभागप्रमुख प्रा.कॅप्टन डॉ. शंकर केशव माने यांची सलग दुसऱ्या वेळी,पुतळाबेन शहा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा.डाॅ.युवराज पवार व महिला राखीव उपाध्यक्षपदी मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या प्रा.सौ.रेखा पाटील यांची निवड झाली.सहसचिवपदी चिखली महाविद्यालयाचे प्रा.डाॅ.मांतेश हिरेमठ, बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथील प्रा.अंकुश कोळेकर,तर महिला राखीवमधून प्रा.(डाॅ.)सौ.नयना गायकवाड यांच्या बिनविरोध निवडी झाल्या.त्याचबरोबर जिल्हा कार्यकारणी वर प्रा.बी.के माने,प्रा.विजय शिंदे,प्रा.युवराज पाटील यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रिया तसेच वार्षिक सभेला मार्गदर्शक म्हणून सांगली जिल्हा ‘सुटा’ शाखा समन्वयक प्रा.टी.व्ही स्वामी यांनी संघटनेच्या वाटचालीचा तसेच प्राध्यापकांच्या प्रश्नांचा आढावा घेत संघटनेपूढील भविष्यातील आव्हाने यांवर मार्गदर्शन केले. वार्षिक सभेचे अध्यक्षस्थानी मिरज महाविद्यालयाचे प्रा.ए.बी.पाटील हे होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवाजी विद्यापीठाचे विद्यमान व्यवस्थापन परिषद सदस्य, डाॅ.बबन सातपुते यांनी काम पाहिले.या सर्व निवडी बिनविरोध झाल्याने सुटा एकसंघ असल्याची प्रचिती आली,अशी माहिती सुटा सांगली चे सचिव प्रा.जे.ए.यादव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमुद केले.

 

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा