*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित लिखित अप्रतिम लेख*
*पेराल तेच उगवेल*
“सुमा, अगं सुमा, ऐकतेस का?
येत्या शनिवारी आपल्या अलकाला पाहायला मुंबईचं स्थळ येणार आहे बरं.”
“मी काय म्हणते पोह्याबरोबर चहा तर करावाच लागेल पण आल्या आल्या वाळ्याचं सरबत दिले तर कसे वाटेल?” …काकू.
“छानच की मी येते ना काकू मदतीला”…सुमा.
“अगं ते तरी येशीलच गं, पण तुझ्याकडे काचेचे क्लास आहेत ना तेवढे आजच धुवून पुसून ठेव, पुन्हा ऐनवेळी गडबड गोंधळ नको”….काकू.
“हो काकू काही काळजी करू नका”…सुमा.
“अगं काळजी काय करू नका? मेल्या त्या पंख्याचे बटन पण आत्ताच बिघडायला हवं होतं का?”…काकू.
“माझ्याकडचा टेबल फॅन देते राजू कडून पाठवून”….सुमा.
असे प्रेमळ हक्काचे संवाद फार पूर्वी नाही पण दोन एक दशकांपूर्वी अगदी बिनधास्त ऐकू यायचे. आता सगळंच चित्र पालटले असेही काही नाही पण शेजाऱ्यांवरचा इतका प्रेमळ हक्क मात्र कमी कमी होत चालला आहे असे दिसते. एक तर जुनी वाड्यातली एका रांगेत असलेली घरे जाऊन उंच टोले जंग इमारतीतले चकाचक फ्लॅट आले. आधीच्या चाळी पाडून त्या जागी टाऊनशिप उभ्या राहिल्या. या चकाचक पॉश फ्लॅट संस्कृतीमध्ये आघळपघळ वागण्या बोलण्याला, काकूबाई पद्धतीने राहण्याला फाटाच दिला गेला. कुणाकडे वाटीभर रवा, साखर मागायला जाणे कमीपणाचे वाटायला लागले आणि सगळी घरे आत्मनिर्भर व्हायला लागली. अगदी विरजण सुद्धा शेजारी मागत न बसता विकतचे दही आणणे सोपे वाटू लागले. हा अलिप्तपणा इतका टोकाचा होत चालला आहे की कधीकधी शेजारी कोण राहते आहे त्यांचे नाव गाव सुद्धा माहिती नसते. आजारी पडल्यावर हाक मारायला सुद्धा कोणी नसते. मोठ्या शहरात तर बंद दाराच्या फ्लॅटमधून वास यायला लागल्यावर मग तपासात पुढे कळते की महिन्याभरापूर्वी कोणी मरून पडलेली व्यक्ती कुजत चालली आहे. असो तर हा माझा विषय नाहीच आहे. मला सांगायचे आहे ते पूर्वीच्या काळी जशी भारतात बार्टर पध्दत होती म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू वगैरे देऊन व्यवहार करण्याची तशी आजकाल नसली तरीपण नेलेली वस्तू कधी ना कधी परत मिळतेच. भले एखाद दुसरा ग्लास धारातीर्थी पडलेला असायचा पण उरलेले ग्लास थोड्या दिवसांनी परत आपापल्या घरी कपाटात विराजमान व्हायचे. ते दोन ग्लास फुटल्याची कुणाला खंत खेद नसायची. कुणाची नवी साडी घडी मोडण्यासाठी, क्वचित प्रसंगी सोन्याचा दागिना, गाडी, भांडी अशा कितीतरी गोष्टी लोक मागून घ्यायचे आणि वापरून परतही आणून द्यायचे. तेवढ्याच हक्काने पैसेही दिले घेतले जायचे पण सारा मामला केवळ आणि केवळ विश्वासाचा होता. पण मोह कली सारखा कधी मनात शिरून विश्वासाला सळो की पळो करून सोडेल काहीच सांगता येत नाही. म्हणतात की हे कलियुग आहे त्याप्रमाणे जर पाहायला गेले तर चांगले सुसंस्कृत सज्जन दिसणारे लोक सुद्धा कुणाला ना कुणाला तरी बुडवून मलिदा लाटताना दिसतात. मंत्र्यांची किंवा लाच खाणाऱ्या लोकांची गोष्ट वेगळीच आहे, तो मुद्दा नाही. मुद्दा आहे किरकोळ उधारी किंवा उसनवारी करणाऱ्यांचा. यामध्ये तीन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे लगेच सकाळी नेलेली वस्तू आठवणीने संध्याकाळपर्यंत परत करणारे लोक. अशा प्रकारातले लोक अगदी नाईलाज झाला तरच दुसऱ्यांकडे वस्तूंची/ पैशांची मागणी करतात आणि ती मागताना सुद्धा त्यांच्या आत्मसन्मानाला खूप मोठी ठेच लागल्यासारखे त्यांच्या हावभावावरून, देहबोली वरून जाणवत असते. समोरच्याला मागणे म्हणजे आपण काहीतरी फार मोठे कमीपणा आणणारे, आपल्या ईस्त्रीच्या घडीवर शिंतोडे उडवणारे वाटते त्यांना. त्यामुळे काम होताच तात्काळ त्याचदिवशी ती वस्तू परत करण्याकडेच त्यांचे सगळे लक्ष असते. अगदी एक रुपया सुद्धा कुणाचा ठेवला जात नाही त्यांच्याकडून.
दुसऱ्या प्रकारातले लोक असतात काहीसे बिनधास्त. हा देऊया की परत उद्या परवा, काय पळून चाललोय का आम्ही? गेलो तरी कुठे जाणार जाऊन जाऊन? पृथ्वी गोलच आहे की, असे उलट देणाऱ्याच्याच गळ्यात त्याचे पाय अडकविणारे हे लोक वस्तू मागताना सुद्धा इतके कमालीचे हातघाईवर येतात की आत्ताच्या आत्ता नाही मिळाली ती गोष्ट तर जसे की टाचाच येणार आहे घरावर इतक्या आजीजीने पटवून देतात आणि एकदा का त्यांच्या या दबावतंत्राला बळी पडून समोरच्याने वस्तू दिली की मग त्यांचा बदललेला रंग बघण्यासारखा होतो. महिनोन महिने तुमची आठवणही येत नाही त्यांना आणि त्या आपल्याच वस्तूची किंवा पैशाची जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा फोनवर फोन करा, उंबरे झिजवा, दबाव आणा, कितीही मागे लागा… या निर्लज्ज महाशयांना त्याची काही म्हणून लाज वाटत नाही. उलट त्यांची उत्तरे अशा थाटाची असतात की मागणाऱ्यालाच लाज वाटावी. पण कालांतराने का होईना या दुसऱ्या प्रकारातली माणसे ती वस्तू किंवा पैसे कुरकुरत का होईना परत करतात.
आता राहता राहिला तिसरा प्रकार, हा अतिशय निर्ढावलेला मनुष्यप्राणी असतो. तो दरवेळी वेगवेगळ्या सावजाच्या शोधात असतो की आता कोणाकडून माल लुटावा? ही माणसे म्हणजे चक्क फसवणूक करणारी असतात. विशेष म्हणजे फार लांब शोधायला जायची गरज नसते. अगदी आपल्या जवळच्या मित्र परिवारातील, कधी नात्यातलीही असू शकतात तर कधी व्यवहारी जगातली असतात.या लोकांना अभिनयाची अतिशय उत्तम देणगी जन्मतःच मिळालेली असते. नाना प्रकारची आमिषे दाखवून, कधी भुरळ पाडणाऱ्या जाहिराती करून, कधी दुसऱ्याला नेमके संकटात गाठून, लाचारीचा फायदा उठवून अशा विविध प्रकारे ते आपल्या जाळ्यात ओढतात आणि एकदा का पैशाची मागणी पूर्ण झाली की जे छुमंतर होतात की बस्स्. इकडे एखाद्याने घरातले दागिने गहाण ठेवलेले असोत, गाडी किंवा घर गहाण ठेवलेले असो किंवा शिक्षणाला आजारपणाला लागणारा पैसा गुंतवलेला असो… असल्या भावनिक गोष्टींना हे लोक कधीही भीक घालत नाहीत, भले मग देणारा कितीही अडचणीत येऊन अजिजी करो, पाया पडो काहीही करो… चक्क शेवटी ते पैसे देणाऱ्याला आपल्या अक्कलखातीच जमा करावे लागतात.
तर चला आज आपणच आपले परीक्षक होऊन, थोडे अंतर्मुख होऊन विचार करूया की या तीन पैकी कुठल्या प्रकारात आपण बसतो? तेही इतरांच्या नजरेतून?
आपण कुणाकुणाचे काय काय देणे लागतो? इतरांच्या किती गोष्टी आपण बिनधास्तपणे वापरून परत करायचं नावही घेत नाही? किती जणांचे तळतळाट आपण आपल्या अकाउंट मध्ये जमा करत चाललो आहोत? किती जणांची हाय आपल्या आत्ताच्या किंवा उतार वयातल्या आयुष्याला लागून त्याचे परिणाम भोगायला तयार आहोत? खरेच असते असे.. माझी आजी सांगायची की या जन्मातले याच जन्मी फेडून जावे लागते म्हणून. आणि ते पटू शकते, फक्त गरज आहे थोडे अंतर्मुख होऊन विचार करण्याची. दुसऱ्याची वस्तू किंवा पैसे परत करेपर्यंत आपल्या मनाला टोचणी लागलीच पाहिजे तर आणि तरच तुमच्यावरचे संस्कार अजून जिवंत आहेत असे म्हणता येईल. पूर्वी लोकांना देवाची भीती होती. वारकरी सांप्रदाय असो, स्वाध्याय परिवार असो, कथा कीर्तने पारायणे भजने अशा गोष्टी लोकांना वाम मार्गावर जाण्यापासून ,फसवणूक करण्यापासून परावृत्त करायची. लोक पुस्तकसाक्षर नव्हते पण संतांच्या शिकवणुकीमुळे म्हणा किंवा पापभिरू मानसिकतेमुळे म्हणा ते सुसंस्कृत नक्कीच होते. आता ना विद्यार्थी शिक्षकांचे ऐकतात ना आई-वडिलांचे ना की वडीलधाऱ्यांचे. आता कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. पण एवढेच लक्षात राहू द्यायचे की जे पेरतोय तेच उगवणार आहे. आज कष्ट केले तर उद्या निश्चितच चांगली फळे चाखायला मिळणार आहेत. रोज अभ्यास केला तर परीक्षेत कॉपी करायची गरजच पडणार नाही. आता तर शहर असो किंवा खेडोपाडीही आई वडील आणि नातेवाईकच मुलांना कॉपी करायला मदत करतात. काय देतो आहोत आपण नव्या पिढीला आदर्श म्हणून? जर आज दुसऱ्याला फसवले तर उद्या आपणही फसणारच आहोत. जे देऊ तेच परत घ्यावे लागणार आहे हा निसर्गाचा अलिखित नियम आहे. आयुष्य फार छोटे आहे. त्यात समाधान आणि आनंद हवा असेल तर दुसऱ्याला लुबाडून तो मिळणार नाही किंवा मिळालाच तर टिकणार नाही; बस्स् एवढे जरी समजले तरी पुढच्या गोष्टी एकदम सोप्या होतात की नाही पहा.
अंजली दीक्षित
९८३४६७९५९६
_______________________________
*संवाद मीडिया*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————
_______________________________
*संवाद मीडिया*
*👮♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮♂️*
*👮♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮♀️
*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*
*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*
*_👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*
https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 नागेश पांढरे : 9422073840*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*