You are currently viewing तेरवण मेढे येथील प्रविण गवस यांची सरपंच सेवा संघ (स्वराज्य)च्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

तेरवण मेढे येथील प्रविण गवस यांची सरपंच सेवा संघ (स्वराज्य)च्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

दोडामार्ग :

 

चोवीस तास लोकसेवेत स्वतःला वाहून घेणारे, उल्लेखनीय काम करून गाव विकासात महत्वाची कामगीरी बजावणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील माजी सरपंच प्रविण नारायण गवस यांच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.

सरपंच सेवा संघाची राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच अहमदनगर येथे पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली. यात सरपंच सेवा संघ (स्वराज्य) च्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी गवस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही निवड अहमदनगर येथील झालेल्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर झाली. याबाबतचे अधिकृत पत्र त्यांना प्राप्त झाले असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

“गाव खेड्यांचा विकास, हाच सरपंच संघटनेचा ध्यास” हे ब्रीदवाक्य घेऊन ही संघटना राज्यात कार्य करते, राज्यातील गावा गावात सरपंचांना मार्गदर्शन करून गावाचा विकास साधण्यासाठी ही संघटना कार्यरत असते त्यामुळे प्रविण गवस यांची ही निवड विशेष असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या संघटनेचे काम वाढवणे व सरपंच संघाच्या माध्यमातून गाव विकास करणे हे आपले ध्येय असल्याचे प्रविण गवस यांनी सांगितले.

तर यादवराव पावसे (ज्येष्ठ मार्गदर्शक), सरपंच चळवळीतील नेते बाबासाहेब पावसे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार, विश्वस्त सुजाता कासार, राज्यसंघटक रविंद्र पवार, संपर्क प्रमुख अमोल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाने संघटनेचे काम पुढे नेणार असल्याचे यावेळी प्रविण गवस म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा