You are currently viewing सावंतवाडी येथे होणार्‍या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राजघराणे आणि महसुल राज्यमंत्री अब्दुुल सत्तार यांच्यात चर्चा….

सावंतवाडी येथे होणार्‍या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राजघराणे आणि महसुल राज्यमंत्री अब्दुुल सत्तार यांच्यात चर्चा….

आम्ही जागा देण्यास तयार आहोत, मात्र योग्य तो मोबदला आम्हाला द्या

बाळराजे खेमसावंत भोसले यांनी केली मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी दौऱ्यावर आलेल्या अब्दुल सत्तार यांनी येथील राजघराण्याची भेट घेतली. यावेळी सावंतवाडी येथे होणार्‍या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जागा देण्याबाबत राजघराणे आणि महसुल राज्यमंत्री अब्दुुल सत्तार यांच्यात चर्चा झाली.

यावेळी आम्ही जागा देण्यास तयार आहोत, मात्र योग्य तो मोबदला आम्हाला द्या, अशी मागणी बाळराजे खेमसावंत भोसले यांनी केली.
यावेळी राणीसाहेब शुभदादेवी भोसले, आमदार दिपक केसरकर, जेष्ठ कार्यकर्ते अण्णा केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, शब्बीर मणीयार, गुणाजी गावडे, योगेश नाईक आदी उपस्थित होते .

आपल्या म्हणण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केला आहे. त्यानुसार आपल्याला भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बाळराजे यांनी केली त्यावर चर्चा झाली. यावेळी केसरकर यांनी लोकांची मागणी असल्यामुळे या ठीकाणी लवकरात लवकर हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. त्यामुळे राजघराण्याने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. त्यानुसार याबाबत लवकरच निर्णय घ्यावा, आवश्यक असल्यास पुन्हा एकदा चर्चा करावी आणि लोकांच्या सोईसाठी लवकरात लवकर ही जागा उपलब्ध करुन देण्यासाठी राजघराण्याने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी सत्तार यांनी केली. यावेळी सावंतवाडीच्या प्रसिध्द लाकडी खेळणी गंजिफासह शहराच्या पर्यटन विकासासाठी योग्य तो प्रयत्न करावा,अशी मागणी राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी केली. यावर आवश्यक ती चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सत्तार यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा