मालवण
येथील सकल भंडारी हितवर्धक संस्था आयोजित कै. सीमा भगवान उर्फ नाना करंजे, कै. राजश्री नारायण आचरेकर, कै. दीपक बलवंत मयेकर यांच्या स्मरणार्थ सर्वधर्मियांसाठी मोफत आरोग्य शिबीर २६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत भंडारी हायस्कूल येथे आयोजित केले आहे. यावेळी मुंबईतील नामवंत रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत. नाव नोंदणीसाठी नीलेश गवंडी (७६२०१४५८०५), प्रदीप वेंगुर्लेकर, पंकज पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.