पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथोत्सव व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. 27 व 28 मार्च या कालावधीमध्ये ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने महालक्ष्मी हॉल, गुलमोहर हॉटेल जवळ कुडाळ येथे दोन दिवसाचे सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. 27 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग, (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथोत्सव व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहेे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन बा. हजारे यांनी दिली आहे.
सोमवार दि.27 मार्च रोजी सकाळी 9 वाजता रा.ब.अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय, कुडाळ (जिल्हा ग्रंथालय) ते महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आफ्रिन करोल, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट याच्या शुभहस्ते ग्रंथ पुजन व ग्रंथदिंडी शुभारंभ होणार आहे. प्रमुख अतिथी, सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, लोकसभा सदस्य विनायक राऊत, विधान परिषद सदस्य ॲङ निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य वैभव नाईक, विधानसभा सदस्य नितेश राणे,कुडाळचे नगराध्यक्षा आफ्रिन करोल उपस्थित राहणार आहेत.
विशेष उपस्थिती, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, मुंबईचे ग्रंथालय संचालक द.अ.क्षिरसागर, मुंबई विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख,गटविकास अधिकारी विजय चव्हाण, को.म.सा.प.अध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य आदी उपस्थिती राहणार आहेत.
सोमवार दि. 27 मार्च दुपारी 3 वाजता स्मरण साहित्यिकांचे यामध्ये वृंदा कांबळी (शांताबाई शेळके), भरत गावडे (अण्णाभाऊ साठे), शरयु आसोलकर (शंकर रमाणी) सहभागी होणार आहेत.
मंगळवार दि.28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कथाकथन कार्यक्रमात वर्षा वैद्य, श्रावणी आरोंदेकर, भरत गावडे, वैशाली पंडीत यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी 3 वाजता भावतरंग निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. सायं.4.30 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने, जेष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मंगेश मसके,यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे.
सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2022 संयोजनासाठी प्रतिभा ताटे,किशोर कांबळे, सागर भोसले, व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी सहाय्य केले आहे.
ग्रंथोत्सव 2022 च्या निमित्ताने ग्रथप्रदर्शन व विक्री तसेच इतर सांस्कृतीक काक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या ग्रंथोत्सवातील विविध कार्यक्रमांना उपस्थितीत राहून सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले आहे.