You are currently viewing संत धर्म

संत धर्म

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य लेखक कवी यश सोनार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*संत धर्म*

धर्म रक्षावया
घेती संत अवतारं…
संत येवूनिया
देती उपदेश साकार..

कोणी चोखोबा
कोणी तुकोबा झाला
धर्म रक्षणाला
संत रुपाने देव आला

संताचिया पाया
करीती नमस्कार…
अज्ञान दुर कराया
दाखविती चमत्कार…

कोणी सावता
कोणी संत नामदेव
भक्ती करोनी
जनी दाखविती देव

मन निर्मळ करोनिया
जोडावे दोन्ही कर…
नेती तरोनिया
अवघा हा भवसागर…

कवी यश सोनार ठेंगोडा
मो 8856835211

प्रतिक्रिया व्यक्त करा