शाळेतला प्रेम
तुझा माझा नाता,
तेव्हाच फुलत होता,
पण आपल्या डेक्सच्यामध्ये,
ता बायग्या डुलत होता.
प्रयत्न माझो चालूच होतो,
तुका हळूच वाकान बघूचो.
तुका बघताना कोणी बघल्यानं,
तर सभ्यपणाचो आव आनुचो.
तुझी मान पाठी फिरताच,
माझो लक्ष तुझ्या डोळ्यार असायचो,
जाता जाता डोळ्याक डोळो भिडताच,
आंगातसून लायटी सारो करंट चमकायचो.
कधीतरी तू माझ्या जवळ यायचंस,
माझी गृहपाठाची वही मागायचस,
वहितल्या चिट्ठीसाठी रातभर जागायचय,
वही मात्र तू रिकामीच द्यायचस.
तरीसुद्धा माका वाटायचा,
नाता आपला आज ना उद्या फुलात.
वहीत लिवक इसारलं आसशीत,
डायरेक्ट तिया मोबायलारच बोलशीत.
(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६