You are currently viewing शिष्यवृत्ती नवीन अर्ज नोंदणी, जुन्या अर्जाचे नूतनीकरणासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती नवीन अर्ज नोंदणी, जुन्या अर्जाचे नूतनीकरणासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

 भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी सन 2022-23 करीता महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीतअशा अनु. जातीविजाभजइमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करणे तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज मंजुरीस पाठविण्यासाठी दि.31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.

             शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची  प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadhtmahait.gov.in  या संकेतस्थळावर सुरु आहे. विद्यार्थ्यानी वेळत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव या कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी दि. 31 मार्च  अखेर कार्यवाही करावी. ज्या विद्याथ्यांचे अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत. अशा विद्यार्थ्याचे अर्ज संबंधित महाविद्यालयांनी नोंदणी करून मंजुरीसाठी पाठविण्यात यावेशिष्यवृत्ती अर्ज भरणे व मंजुरीसाठी पाठविण्याची दि. 31 मार्च ही अंतिम मुदत असल्याने या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जवाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नूतनीकरण करणेबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणसिंधुदुर्ग कार्यालय (दूरध्वनी क्र. 02362-228882) येथे संपर्क साधावाअसे आवाहन ही समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. चिकणे यांनी केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा