सावंतवाडी
सातार्डा – तरचावाडा येथील रहिवासी व माजी सरपंच व्यंकटेश शांबा मांजरेकर (89) यांनी बुधवारी पहाटे घरासमोरील फणसाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लाऊन आत्महत्या केली. डोळ्यांनी दिसत नसल्याने श्री मांजरेकर यांनी वैतागून आत्महत्या केल्याचे समजते.व्यंकटेश मांजरेकर यांनी तीन ग्रामपंचायत निवडाणुकांमध्ये बारा वर्षें सातार्डा सरपंचपद भूषविले होते. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्या डोळ्यांवर उपचार सुरु होते. दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. महागडे उपचार त्यांच्या डोळ्यांवर सुरु होते असे कुटुंबियांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना अस्पष्ट दिसत होते. डोळ्यांनी दिसत नसल्याने वैतागून व्यंकटेश मांजरेकर यांनी आत्महत्या केल्याचे समजते.
आत्महत्या केल्याची खबर त्यांचा मुलगा महेंद्र मांजरेकर यांनी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक, पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. पच्छात पत्नी, मुली, दोन मुलगे, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील सातार्डा मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष महेंद्र मांजरेकर यांचे ते वडील होत.