मालवण
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे. सकाळी मंदिरासमोर गुढीउभारण्यात आल्यानंतर दुपारी वाजतगाजत कानविंदे यांच्या वाड्यावरुन श्रीरामाची उत्सव मुर्ती आणून मंदिरातील नंदीचौकावर प्रतिष्ठापना केली गेल्यानंतर या उत्सवाला सुरुवात झाली. निलेश सरजोशी आणि जोशी पुराणिक यांनी नुतन वर्षाचे संवत्सर फल पंचागवाचन केले. नंदीचौकावर मुर्ती प्रतिष्ठापनेनंतर रघुपती आरतीसह रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घातली गेली . गुढीपाडव्यापासून आता दररोज सकाळी दहा वाजता दरबारी गायन दुपारी साडेबारा वाजता रघुपती आरती,सायंकाळी चार वाजता माखन ,पाच वाजता सभामंडपातील पुराण वाचन, सायंकाळी सहा वाजता दरबारी गायन, रात्री आठ वाजता महापूजा, मंदिरातील पुराण वाचन रात्रौ रघुपती आरतीची रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा, त्यानंतर रात्री पालखी सोहळा असे कार्यक्रम होतात.या पालक परीक्रमेस भाविकांची अलोट गर्दी उसळते. यानंतर कीर्तन हे दैनंदिन कार्यक्रम २२मार्च ते एक एप्रिल ललीतोत्सवा पर्यंत चालणार आहेत. यावर्षीच्या उत्सवाचे कीर्तनकार बुवा म्हणून ह भ प संजय बुवा करताळकर नागपूर यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. त्यांना संगीत साथ आनंद लिंगायत तर तबला साथ अभिषेक भालेकर हे करणार आहेत
शुक्रवार २४मार्च रोजी सुधांशू सोमण मिठबांव यांचे गायन होणार आहे. शनिवार २५ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अथर्व परेश पिसे यांचे गायन ,रविवार २६ मार्च रोजी सकाळी दहा वाजता दिलीप ठाकूर यांचे गायन त्यांना ऑर्गन साथ भालचंद्र केळूस्कर यांची लाभणार आहे.सायंकाळी साडेपाच वाजता शास्त्रीय गायन गायिका समीक्षा भोवे काकोडकर गोवा, सोमवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी दहा वाजता विनय वझे व सहकारी यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे .मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी दहा वाजता व सायंकाळी साडेपाच वाजता तसेच बुधवार २९मार्च रोजी सकाळी दहा वाजता गायक नितीन ढवळीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे तर सायंकाळी साडेपाच वाजता पंडित राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे यांचे गायन होणार आहे .गुरुवार ३० मार्च रोजी राम जन्माचे किर्तन मिलिंद बुवा कुलकर्णी यांचे होणार आहे.
सायंकाळी साडेपाच वाजता निराली कार्तिक पुणे यांचे गायन होणार आहे शुक्रवारी ३१ मार्च रोजी सकाळी दहा वाजता निराली कार्तिक पुणे यांचे गायन होणार आहे शनिवारी १ एप्रिल रोजी साडेनऊ वाजता विठ्ठल रखुमाई मित्र मंडळाचा आचरा आनंदरंग हा कार्यक्रम होणार आहे गुरुवार पाच एप्रिल रोजी रात्री हनुमान जयंती निमित्त रामेश्वर प्रोडक्शन मुंबई यांचे दोन अंकी नाटक गाव तसं चांगलं होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रामेश्वर देवस्थान समिती तर्फे करण्यात आले आहे