*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते आणि बोरिवली बार असोसिएशनचे सदस्य*
*ॲड. धनंजय जुन्नरकर ह्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी!*
मुंबई वार्ताहर-
मंगळवारी सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) अनंत गिते यांच्याशी झालेल्या वादातून पृथ्वीराज झाला या वकीलाला कांदिवली पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली ह्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते आणि बोरिवली बार असोसिएशनचे सदस्य
ॲड. धनंजय जुन्नरकर ह्यांनी (एपीआय) अनंत गिते ह्यांचे निलंबन करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे केली आहे.
एपीआय गिते यांनी आमच्या वकिलाला कारण नसताना चार वेळा चपराक मारली आणि अतिशय उद्धटपणे वागले. बोरिवली बार असोसिएशनचे चे अध्यक्ष राजेश मोरे ह्यांनी वकिलांसह दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात जाऊन सदर अधिकाऱ्याला नोकरीवरून काढण्याची मागणी केली. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली, त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.
पण कांदिवली पोलीस स्टेशन मध्ये सामान्य माणसाची कामे होत नाहीत, बिल्डरांना सहानुभूती मिळते , वकिलांना मारहाण होते आणि सदर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे काहीही नियंत्रण नाही . त्यामुळे तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्यांची देखील बदली करण्यात यावी अशी मागणी देखील ॲड.
धनंजय जुन्नरकर ह्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे केली असल्याचे समजते.
याशिवाय, अधिवक्ता संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक वकिलांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीही याचिकेवर स्वाक्षरी केली होती.
काँग्रेस शासित राजस्थान राज्याने कालच वकिलांचे संरक्षण बिल मंजूर केले असून शिंदे सरकार ने महाराष्ट्रात त्वरित सदर बिल मंजूर करावे अशी मागणी देखील ॲड.
धनंजय जुन्नरकर ह्यांनी
केली आहे.