सावंतवाडी
योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई आणि सावंतवाडी येथील प्राणा वेलनेस गोल्डन मीरॅकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रोणापाल येथील दयासागर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंसह शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
वर्ल्ड प्राणीक हिलींग फाउंडेशनचे संस्थापक मास्टर चोआ कॉक सुई यांच्या महासमाधी दिनाचे औचित्य साधून हे साहित्य वितरित करण्यात आले. तसेच यावेळी द्विहृदय ध्यान, हिलींग कार्यशाळा, प्रार्थना आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी जयपूर येथील गौतम व प्रतीची आयलानी, दिल्ली येथील पौर्णिमा गौतम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या उपक्रमासाठी श्वेता धोंड, मैथिली नाईक, डॉ गौरी तानावडे, स्वाती शिरसाट (पुणे), अश्विनी दिवेकर (पुणे) यांचे सहकार्य लाभले.
यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना किमान महिनाभर आवश्यक असलेले धान्य, कडधान्य, मसाले, बटाटे, कांदे, खाऊ, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट व ब्रश, फिनाईल
आदी जीवनावश्यक वस्तूंसह वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी वसतिगृहाचे व्यवस्थापक जीवबा वीर यांनी दोन्ही संस्थासह त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी अँड्र्यू फर्नांडिस, कविता पाटील, डॉ मुग्धा ठाकरे, डॉ. प्रविणकुमार ठाकरे उपस्थित होते.