You are currently viewing आजगव दलितवस्ती ते शिरोडा दलितवस्ती रस्त्याचे काम करा

आजगव दलितवस्ती ते शिरोडा दलितवस्ती रस्त्याचे काम करा

तिरोडा सरपंच, उपसरपंच यांची सार्वजनिक बांधकामाकडे मागणी

सावंतवाडी

आजगाव दलित वस्ती पासून शिरोडा दलित वस्तीला जोडणाऱ्या खाजणादेवी येथील नादुरूस्त पुलाचे काम करा अशी मागणी तिरोडा सरपंच प्रियांका सावंत व उपसरपंच संदेश केरकर यांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांच्याजवळ केली.

सरपंच सौ. सावंत यांनी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता चव्हाण यांची भेट घेतली.

यावेळी झालेल्या चर्चेत आजगाव दलित वस्ती पासून शिरोडा दलित वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावरील खाजनादेवी येथील पूल नादुरुस्त झाले असून ते केव्हाही कोसळण्याची भीती आहे सदर रस्त्याचे काम सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले परंतु पुलाचे काम न करता असलेल्याच पुलावर सिमेंट काँक्रीट घालून डागडुजी करण्यात आले आहे परंतु कमकुवत झालेले हे फुल कधीही कोसळण्याची भीती असल्याने त्या ठिकाणी अपघात होण्याची भीती आहे त्यामुळे पुलाचे नव्याने बांधकाम करा अशी मागणी सरपंच सौ. सावंत यांनी केली.

यावेळी उपसरपंच केरकर म्हणाले सदर पुलाची उंची ही मोठी असल्याने अपघात झाल्यास बदरा फूट खाली वाहने कोसळण्याची भीती आहे तूरडा बाजारपेठेत जाण्यासाठी आजगाव भोम नाणोस गुळदूवे येथील ग्रामस्थ याच रस्त्याचा वापर करतात त्यामुळे भविष्यात अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होणार आहे.
दरम्यान बांधकाम चा कार्यकारी अभियंता यांनी सदरचा रस्ता हा जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे मात्र ओडिया अंतर्गत बजेट मधून प्राप्त निधीचा खर्च करण्यास सार्वजनिक बांधकाम ला सूचना असल्याने आम्ही त्या ठिकाणी काम केले येणाऱ्या आर्थिक वर्षात पुन्हा एकदा ओडिया बजेट अंतर्गत या रस्त्याचे काम घेण्यात येईल परंतु तात्काळ रस्त्याचे काम होणे गरजेचे असल्यास जिल्हा परिषद कडे मागणी करण्याची सूचना केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा