You are currently viewing दोडामार्ग,चौकुळ,आंबोली ह्या भागातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीवर कायम स्वरूपी तोडगा काढावा..

दोडामार्ग,चौकुळ,आंबोली ह्या भागातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीवर कायम स्वरूपी तोडगा काढावा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांची विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे मागणी..

सावंतवाडी

सावंतवाडी मतदारसंघातील दोडामार्ग, चौकुळ, आंबोली हा संपूर्ण परिसर निसर्गसंपन्न असून येथील अर्थव्यवस्था ही भात शेती व बागायतीवर अवलंबून आहे. येथील भूमिपुत्रांनी मोठ्या कष्टाने जमिनींमध्ये फळबागा विकसीत केल्या आहेत. परंतू सध्या या सर्व शेती व बागांना हत्ती, गवेरडे, माकड, केलडी, डुक्कर इत्यादी जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवत आहेत. येथील शेतकरी हा आर्थिकदृष्टया संपन्न नाही. परंतू मिळेल त्या उत्पन्नावर आपली उपजिवीका करीत आहे.आधीच दरवर्षी येणारी वादळे,अतिवृष्टी यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्यात आता या प्राणीसंकटाची देखील भर पडली आहे, त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

सदयस्थितीत अधिवेशन सुरू आहे. आणि या पार्श्वभूमिवर या महत्वाच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. त्याला श्री. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत आपण निश्चितच पाठपुरावा करू, असे सांगितले. याबाबत सौ. घारे यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा