You are currently viewing नविन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी

नविन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी

अध्यक्ष नविन कुर्ली विकास समिती तसेच जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंत पिळणकर यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

कणकवली

नविन कुर्ली, (ता. वैभववाडी,) येथील देवधर मध्यम पाटबंधारे येथील प्रकल्पास विस्थापित प्रकल्पग्रस्त यांना सन 1989 साली प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर प्रकल्पाच्या अनुषंगीक कामकाजास सुरवात करणेत आली परंतू आत्तापर्यंत सर्व प्रकल्पग्रस्तांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातील काही प्रमुख मुददे आपणासमोर मांडत असून सदर मुदयावर आपले स्तरावरुन उचित कार्यवाही कराल अशी आम्हा प्रकल्पग्रस्तांची दृढ इच्छा आहे. महत्वाचे मुददे खालीलप्रमाणे..

1. प्रकल्पग्रस्त पुनर्वसन फोंडा लोरे ता. कणकवली याठिकाणी भूखंड पाडून 1995 साली भूखंडाचे प्रत्यक्ष वाटप करावयास सुरवात झाली. त्यामुळे महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 मधील तरतुदीप्रमाणे आमच्या पुनर्वसित गावठाणात 18 नागरी सुविधांची पुर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही त्यापासून वंचीत राहिलो.

2. पुनर्वसित गावठाणात नविन कुर्ली असे नामकरण देऊन मा. जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग यांनी दिनांक 25/02/2002 रोजी आदेश काढून महसुली गांव म्हणून घोषीत केला आणि सन 2003 मध्ये प्रकल्पाची घळभरणी करुन प्रकल्पामध्ये पाणी साठा करणेत आला. त्यामुळे नागरीकांना मुळ कुर्ली गावातून स्थलांतरीत व्हावे लागले. परंतू नविन गावठाणाचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे अदयापी झालेले नाही.

3. नविन कुर्ली हे पुनर्वसित गावठाण महसुली गांव म्हणून घोषीत झाल्यावर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापण करणेबाबतचा शासन निर्णय प्र.व्ही.पी.एम. 2603/प्र.कृ. 1544 /पंस.4 (22) दि. 12/02/2004 नुसार ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत प्रशासकीय पातळीवरुन त्वरीत कार्यवाही होणे अपेक्षीत होते. परंतू स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव तयार करुन ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सिंधुदूर्ग यांचेकडे सादर करुन 20वर्षे झाली तरी अदयप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरीकांना मुलभूत हक्कापासून वंचीत रहावे लागत आहे.

याबाबत मौजे नविन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत आपणांकडून योग्य ती कार्यवाही त्वरीत करणेत यावी. अन्यथा मी व प्रकल्पग्रस्त दिनांक 1 मे 2023 या कामगार दिनादिवशी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदूर्ग या ठिकाणी उपोषण करणार आहोत. असे अध्यक्ष नविन कुर्ली विकास समिती नविन कुर्ली फोंडाघाट तसेच जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंत गंगाराम पिळणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*संवाद मिडिया*

🚒🚒 *बोअरवेल क्षेत्रांतील खात्रीशीर नाव*🚒🚒

*💧एल.एम. बोअरवेल💧*

🏞️ *३०० फूट लांब, मोठे होल ६”(इंच)बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करून मिळेल.*

*💁‍♂️ *१००% कामाचा हमी हीच आमची ओळख*

💧💧💧💧💧💧💧💧💧

*💦 ४.५”, ६”, ६.५”, ९*
*💦बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*💦बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*💦पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*💦अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*💦नवीन पंप बसवून मिळतील.*
*बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*💦 होल मारून मिळतील.*
*💦 बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एल.एम.बोअरवेल*

*📌आमचा पत्ता : हुंबरट टीठा, मुंबई गोवा हायवे, कणकवली, जि.सिंधुदुर्ग*

*📌 चिंतामणी पार्क, एस एम हायस्कूल समोर, कणकवली, सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. लवू परुळेकर*

*संपर्क 👇*
*📱*9420741599 / 8669193749*

 

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा