*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य लेखक कवी गझलकार श्री.जयराम धोंगडे यांच्या गजलेचं लेखक कवी श्री.बाळासाहेब तिरानकर यांनी केलेलं रसग्रहण*
रंगात न्हाली गझल… जय हो!
भारतीय संस्कृतीमधील सणोत्सवांच्या मांदियाळीत रंगपंचमी या सणाचे वेगळे महत्तम महत्व आहे. तन मन हर्षोल्हासीत करून टाकण्याची किमया या सणाने अलवार साधली आहे. रंगांची भुरळ मानवी मनावर पुर्वापार जरी असली तरी द्वापारयुगात अवतरलेल्या कृष्ण सख्याने मानवी मनाचे अवघे आकाश सावळ्या रंगाने भारून टाकले आहे. इंद्रधनुतील ‘ता ना पि हि नि पा जा’ या सप्तरंगातील पाचवा ‘निळा’ रंग नभच काय अवघे ब्रह्मांड व्यापून आहे. पाण्याला स्वतःचा रंग नसला तरी ते नदी वा सागरात निळेशारच भासते. क्षितिज आणि नभ ही निळे, शाम-राम निळे सावळेच; असे असूनही जरी एकट्या राधेला सावळ्याची बाधा झाली असली तरी शाम सख्याने जगावर सप्तरंगी- तत्वज्ञानाची भुरळ घातली आणि म्हणून सुरदास, तुलसीदास पासून आजही मनीचे गोकुळ कधी रिते होत नाही. वर्षे येतात नि जातात पण रंगपंचमी माणसाचे रंगभान तेवत ठेवते आणि कवि-गझलकार गोकुळ आणि राधा-कृष्णावर लुब्ध झाल्याविना राहत नाहीत. अलिकडेच उद्यास आलेले पण युगांना कवेत घेणारे, माझे सन्मित्र आणि नांदेडचे नामवंत गझलकार श्री जयराम धोंगडे यांना अशीच रंगीत भुरळ अलवार पडली आणि एका सुंदर गझलेला त्यांनी जन्मा घातले.
“गोकुळी गोपिका दंग झाल्या जरा
रंग तो माखला सावळ्या श्रीहरा!”
रंगपंचमीच्या रंगोत्सवात कालिंदीतिरी गोकुळी, गोपिका भान हरपून दंग झाल्या आहेत…. मिळून साऱ्या जणींनी सावळ्या कृष्ण सख्याला रंगाने माखून टाकलेले आहे… या ओळी जरी नेहमीचे दृश्य आणि भावार्थ घेऊन आलेल्या वाटत असल्या तरी माधवाच्या परा-भक्तीत रंगून जातांना भक्तीच्याच विविध रंगाने सावळ्या श्रीहरीला गोपीकांनी माखून टाकले हा भावार्थ अध्यात्म दृष्टीने पाहता वेगळाच अन्वयार्थ घेऊन अवतरतो.
‘स्त्रग्विनी’ या मधुर गेय वृत्तात लिहिलेली जयरामजींची ही गझलरचना वेगळा भाव घेऊन येते नि वेगळा भाव खाऊन जाते.
“लावला रंग की लागला ना कळे,
रंगले रंगणे सोहळा साजरा!”
लौकिकार्थाने कृष्णाला रंग लावला गेला की अलवार लागला हे कळत नाही आणि रंगणे अन् रंगून जाणे असा रंगारंग सोहळा साजराच असणार पण या शेरातील शब्द आणि अर्थाच्या पलीकडील भावार्थ शोधला तर असे दिसून येते की देव आपल्या प्रेमात पडला की आपण नकळत त्याच्या भक्तीत रमलो या द्वंदाचा उलगडा सहजपणे होत नाही…. आणि या भक्ती रंगात न्हाऊन निघणे हा परमार्थातील पारलौकिक रंगायमान- रंगभान सोहळा, भक्तीमार्गातील व्यामिश्र दंगलेपण अधोरेखीत करतो.
शाम तर राधिकेच्या रोमरोमी बसलेलाच आहे. तिच्या तन रंध्रातून अणु-रेणुसारखा संप्रेषीत झालेला आहे. भौतिकदृष्ट्या मोहन दृष्टीस पडला नाही तर राधा कावरीबावरी होते खरी पण शामचा चेहरा समोर वा मन:पटलावर दिसला तरी ती एवढी देहरंगी रंगून जाते की तिचा मुखडा तिच्याही नकळत साजरा नि लाजरा होऊन जातो.
…आणि भावविभोर राधेच्या मनरंगी अलौकीक प्रितीचे पवित्र भरते येते. प्रेमसागर उचंबळतो नि भावना काळजाच्या किना-यावर अलगद दाटुन येतात. अशाप्रकारे प्रेम दाटून आल्यावर काय होते याचा सबळ, सात्विक पुरावा देतांना गझलकार जयराम धोंगडे ईश्वराच्या शाश्वततेचे आणि श्रद्धा भावनेचे सुंदर दर्शन घडवितात.
“दाटले प्रेम अन भावला तो मना
कृष्ण वाटे सखा केवढा तो खरा !”
अंतरीच्या आभाळात प्रेमाचे अलोट ढग जमले की मनमोर नाचायला लागतो, पाऊस न येताही कृष्णमेघ दिसले की मयुरमन हर्षोल्हासित होते व धुंदविभोर होऊन नाचू लागते. श्रीहरी आवडायला लागतो. मन अंधारले की प्रकाशाची रास होऊन मनीचा कृष्ण वाट दाखवतो. तो मित्र वाटतो… पवित्र वाटतो… आप्तसखा वाटतो आणि एवढेच नाही तर त्याचे विश्वव्यापी गवसणारे अस्तित्व अचानक शाश्वत आणि खरे वाटू लागते.
गझलकार श्री जयराम पुन्हा रासलीलेत रममान होत लिहून जातात…
“रासलीला अशी मोहिनी घालते
खेळण्या त्यासवे होय मन भोवरा!”
कृष्ण-राधा नि गोपिकांची रासलीला हे मानवी व्यवहाराचे प्रतिकात्मक रूप आहे. तन मनाचे परस्परावलंबीत्व हे मानवी वागण्यातील अतूट नाते-बंध आहे. त्यांची पृथगात्मकता कोणत्याही पातळीवर असूच शकत नाही. मानवी आयुष्यात जिवन जगतांना येणाऱ्या विविधांगी सुखद-दु:खद घटनांच्या पडसादाचा, प्रतिध्वनीचा मनीचा कल्लोळ अनेक लिलांनी संपृक्त होऊन जातो आणि नियती माणसाला भोवऱ्यासारखे त्याच्या स्वतःच्या छोट्या आसाभोवती गरगरत ठेवते. भोवऱ्याचे भान म्हणजे त्याचे फिरणे…. तेच त्याचे जग आणि जगणेही… असा आशय घेऊन येणारा हा शेवटचा शेर मन खिन्न नाही पण नश्वरतेच्या जाणिवेने सुन्न करून गेला.
रंगपंचमीच्या या रंगारंग दिनी जयरामजीची ‘रंगारंग’ गझल मानस शाम रंगात रंगवून गेली.
धन्यवाद !
बाळासाहेब तिरानकर
कल्याण, मुंबई
_______________________________
*संवाद मीडिया*
*👮♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮♂️*
*👮♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮♀️
*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*
*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*
*_👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*
https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 नागेश पांढरे : 9422073840*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
_______________________________
*संवाद मीडिया*
*👉मोफत समुपदेशन….मोफत समुपदेशन …*
*”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने*
*” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी*
🔹रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी, यांच्या वतीने *_”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने “_* १२ वी नंतर विविध क्षेत्रातील सुवर्ण संधींवर मार्गदर्शन हा मोफत समुपदेशन कार्यक्रम *_शुक्रवार , दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:००_* या वेळेत *मराठा भवन मंगल कार्यालय* ,जिल्हा परिषदे जवळ , रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे .
*प्रमुख वक्ते :प्रा .विजय नवले (करिअर पाथ निर्मिती मध्ये विश्वविक्रम करणारे तज्ञ )*
🔹या कार्यक्रमासाठी मोफत नाव नोंदणी खालील गुगल फॉर्म लिंक द्वारे करावी .
https://forms.gle/Sv7pZYtT9X1Lw2F18
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*
*कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वूमेन*
*📲संपर्क क्रमांक :*
*९४२०२७४११९*
*७९७२९९७५६७*
*Advt link …👇*