You are currently viewing दीपक केसरकर सावंतवाडीत दाखल….

दीपक केसरकर सावंतवाडीत दाखल….

सायंकाळी साडेपाच वाजता सावंतवाडीत भरगच्च पत्रकार परिषद

कोविड-१९ च्या काळात सवंग लोकप्रियतेसाठी न फिरता “घरातच रहा आणि सुरक्षित रहा” असा संदेश मतदारसंघातील जनतेस देत मुंबईतच घरात राहून आपल्या मतदारसंघावर लक्ष ठेऊन असलेले सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, माजी पालकमंत्री दीपक केसरकर आज सावंतवाडीत दाखल झाले. कोरोनाचा उपद्रव कमी झाल्यावर मतदारसंघात येऊन सक्रिय झालेले दीपक केसरकर यांनी मुंबईत राहूनच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे प्रश्न हाताळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नसले तरी जिल्ह्यावरील आपल्या प्रेमापोटी त्यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले होते.
आज मतदारसंघात दाखल होताच त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांसोबत आज संध्याकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून त्याच पत्रकार परिषदेतून मागील आठ महिन्यांचा लेखाजोखा ते आपल्या मतदारांसमोर मांडणार आहेत. केसरकर जिल्ह्यात नसताना अनेकांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले होते, त्यांनाही शांतपणे नक्कीच शालजोडीतले देतील अशी अनेकांची खात्री आहे. आपल्या शांत, संयमी स्वभावामुळे त्यांनी मतदारसंघातील जनतेची मने जिंकली आहेत. कोरोनाच्या काळात अनेक नेते विनाकारण मतदारसंघात फिरून जनतेच्या जीवितास धोका निर्माण होईल असे वागत असताना केसरकर मात्र कोणीही कितिही टीका केली तरी स्वतःबरोबर जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी प्रयत्नशील होते.
केसरकर मतदारसंघात नसताना मतदारसंघाचे वाली आपणच असे काहीजण वावरत होते, त्यांनाही खिळाडूवृत्तीने घेणारे दीपक केसरकर आजपासून पुन्हा एकदा मतदारसंघात सक्रिय होणार असून लोकांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतील. कित्येकजण त्यांच्या येण्याची वाट पाहत होते त्यांची प्रतीक्षा आज संपुष्टात आली असून आजच्या पत्रकार परिषदेतून ते भविष्यातील वाटचालीबाबत देखील भाष्य करतील अशी आशा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा