आंब्रड-कुंदे रस्त्यासाठी ४ कोटी ३९ लाख रु. निधी मंजूर केल्याबद्दल मानले आभार*
*आमदार फंडातील आंब्रड रतांबेवाडी रस्त्याचे सरपंच मानसी कदम यांच्या हस्ते भूमिपूजन*
आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार आणि पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत आंब्रड परबवाडी नाटेकरवाडी ते कुंदे कदमवाडी जाणाऱ्या रस्त्यासाठी ४ कोटी ३९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आंब्रड आणि कुंदे वासीयांची गरज ओळखून आ.वैभव नाईक यांनी हा रस्ता मंजूर केल्याबद्दल शनिवारी आंब्रड गावाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करत आभार मानण्यात आले.
त्याचप्रमाणे आंब्रड-कुंदे मुख्य रस्ता ते आंब्रड रतांबेवाडी श्री. चंद्रकांत गावडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आ.वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून ५ लाख रु. निधी मंजूर केला आहे. आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सरपंच मानसी कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आ. वैभव नाईक यांनी आंब्रड सरमळेवाडी येथील तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत लवकरच ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी यांची बैठक लावणार असल्याचे सांगितले.तसेच गावच्या विकासासाठी आवश्यक तो निधी पुरविला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी विभागप्रमुख विकास राऊळ, विभाग संघटक दिनकर परब,सरपंच मानसी कदम,उपसरपंच विठ्ठल तेली,माजी पं.स.सदस्य प्रवीण भोगटे,माजी सरपंच संदीप परब, माजी उपसरपंच विजय परब,आनंद परब,माजी जि.प.सदस्या कल्पीता मुंज, ग्रामपंचायत सदस्य सागर वाळके, सेजल परब, तात्या आंगणे, शाखा प्रमुख रमेश परब, बबन परब, अशोक मसुरकर,सीताराम नाटेकर,दयानंद तावडे,अनिल परब आदींसह शिवसैनिक व आंब्रड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.