*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*जीवनातली रंगपंचमी.*
सोसायटीच्या आवारात रंगपंचमीची धमाल चालली होती. मुलं-मुली, तरुण-तरुणी, काही पांढरे केसही मस्त सामील झाले होते. मी गॅलरीत उभी राहून या रंगपंचमीची मजा बघत होते. इतक्यात रमिलाने मला खालून जोरात हाक मारली.
” आँटी आप भी आवो ना.”
आणि नंतर मी त्या रंगांच्या खेळात नकळत मिसळून गेले.
मस्त. वय विसरायला लावणारा, आतून आनंदाचे रंग वहात असल्याची जाणीव देणारा, प्रतिष्ठेच्या, शिष्टाचाराच्या, मोठेपणाच्या सगळ्या बाळगलेल्या समज गैरसमजांना पार उधळून धावणारा हा रंगांचा खेळ.
घरी आल्यावर आरशात सहज पाहिलं आणि तो रंगाने माखलेला, ओळखूही न येणारा माझा चेहरा पाहताना मला खूप हंसू आलं. क्षणभर वाटलं हाच खरा आपला चेहरा. आणि मनात आलं खरोखरच जीवन ही सुद्धा अशीच एक रंगपंचमीच आहे की!
आपण जन्माला येतो तेव्हां एक कोरा जीवनपट घेऊनच येतो. आणि ब्रह्मदेवाने एक अदृश्य रंगपेटी आपल्याजवळ दिलेली असते. आणि जगत असतानाच आपल्याला त्यात एकेक रंग आवडीप्रमाणे भरायचे असतात.
माझ्या जीवनाचा कॅनव्हास आता जवळजवळ पूर्ण झालाय. मी सहज पुन्हा त्याला स्टॅंडवर ठेवले. आणि त्या जीवनपटावरची रंगभरी रांगोळी निरखू लागले. तिथे कितीतरी रंग माझ्या डोळ्यासमोर उलगडू लागले. आणि त्यांचे अर्थही जाणवू लागले.
हे छान फुलपंखी रंग! हे माझं रम्य बालपणच होतं की! पण त्यातही मधून मधून मला काही राखाडी रंगाच्या छटा दिसत होत्या. त्या नक्कीच दुखावलेल्या बालमनाच्या असतील. सवंगड्यांबरोबर झालेल्या रुसव्या फुगव्याच्या असतील. कधी खेळताना हरल्याच्या, आईच्या रागवण्याच्या, कुणी बोलण्याच्या, डावलल्याच्या, रडीचा डाव खेळण्याच्याही असतील.
बालपण केव्हांतरी उलटून गेलेलं दिसलं. त्यानंतरचे हे चांदण रंग, मोरपंखी, गुलाबी अगदी हलके हळुवार. त्यात उमलणाऱ्या प्रीतीचे जसे रंग होते तसेच उसळणाऱ्या ध्येयांच्या धमनीतून वाहणारे, काहीसे गडद रंगही होते. आकाशात पसरलेल्या रंगांशी जणू त्यांची स्पर्धा चाललेली दिसत होती. हे इंद्रधनुषी रंग पाहताना मात्र मी हरखून गेले. या रंगांची झळाळीच काही वेगळी होती. यात प्रचंड चमक होती. जीवनावरच्या प्रत्येक पानापानावर हिरवाई दाटलेली होती.
हळूहळू हे कोवळे कोमल रंग प्रौढ झाले. आता आयुष्य पुढे सरकत होतं. नवीन नाती जुळत होती. नवे विश्व साकारत होते. तळ्यातलं गुलाबी कमळ आता पूर्ण उमललेलं होतं. आणि त्याचबरोबर प्रियजनांचे, मातापित्यांचे हात एकेक करत सुटत होते. ढगाळलेल्या, काळसर आकाशात हे हरवलेले चेहरे, धूसर झालेले चेहरे मी शोधत होते. एक दाट पापुद्रा त्यावर पसरलेला होता.
या मधल्या काळात मात्र अनेक रंगांचं मिश्रण होतं. काही हलके होते, काही गडद होते, काही सावल्यांचे तर काही प्रकाशाचे रंग होते. आणि कळत नकळत या जीवनपटावरच्या रचत चाललेल्या रंगपंचमीत , अनावधानतेने हे काहीसे विद्रूप, डोळ्यांना खुपणारे नकोसे, चिखलाचे रंगही ओघळले होते. काट्याकुट्यातून चालताना खाच— खळगे ओलांडताना रक्तबंबाळ झालेल्या देहाचेही रंग त्यात आढळले. कदाचित ते असावेत मनातल्या दु:खाचे, रागांचे, द्वेषाचे ,अहंकाराचे , लोभाचे, ईर्षेचे, कडवटपणाचे. पण ते फारच ओंगळ भासत होते. या क्षणी वाटत होतं, वेळीच आपण हे रंग का नाही पुसले? आज याची खंत वाटत होती. मन रुखरुखत होतं. ब्रह्मदेवांनी दिलेल्या रंगपेटीचा आपण त्यावेळी नक्कीच गैरवापर केला का? पण मग मनात आलं, रंगपंचमी खेळताना आपल्या चेहऱ्यावर, कोण कुठला रंग फासेल हे कुठे आपल्या हातात असतं? नंतर जाणवलं आपण खूप प्रयत्न केलाय. प्रेमाचे, दयेचे, शांतीचे,क्षमेचे, करुणेचे, माणसाला माणूस जोडण्याचे रंग भरण्याचा.
हळूहळू माझ्या जीवनाचं हे रंगीबेरंगी लँडस्केप मला स्थिरावलेलं दिसत आहे. अजुन ओले सुके रंग आहेत.पण आता उसळणाऱ्या लाटांचा तो फेसाळणारा रंग, ओसरत चाललाय. त्याची जागा खोल पाण्याच्या गहिऱ्या रंगाने घेतली आहे. प्राचीचे ते तळपदार रंग आता पश्चिमेच्या हलक्या, निळ्या, जांभळ्या, प्रसन्न, शीतल, केशरी वर्णात हळूहळू मिसळत आहेत. अचानक झाडावरची ही हिरवी पानंही पिवळसर होत चाललेली आहेत. पण हे संध्या रंगही ओढ लावत आहेत. एक नवाच भक्तीचा, अध्यात्माचा विरक्तीचा शुभ्र रंग पांघरत आहेत. किती नेत्र सुखद आहे हे सारं! या जीवनपटावर बागडणारा एक रंगीबेरंगी पक्षी आता जणूं काही निळ्या आकाशाकडेच टक लावून बसला आहे.रंगपंमी खेळून झाली आहे आता!
आता मात्र या आयुष्याच्या कागदावरची ही रंगपंचमी एकमेकात इतकी बेमालूमपणे मिसळली आहे की अवघा रंगच एक झाला आहे.मी राधिका आणि रंगात न्हालेला तो पलीकडचा श्रीरंगही गवसलेला आहे..
*राधिका भांडारकर*
#######################
*संवाद मीडिया*
*👮♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮♂️*
*👮♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮♀️
*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*
*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*
*_👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*
https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 नागेश पांढरे : 9422073840*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*