सावंतवाडी ,:
रक्त दरवाढी विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेने शनिवारी १८ मार्च रोजी सावंतवाडीत पुकारलेले ‘रक्तदान आंदोलन’ स्थगित केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केल्यामुळे तसेच सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी विनंती केल्याप्रमाणे आंदोलन स्थगित केल्याचे सूर्याजी यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने रक्तपिशवीचे शुल्क ४५० रुपयावरुन तब्बल ११०० रूपये केले आहे. रक्तासारख्या महत्त्वाच्या घटकावरील ही दरवाढ सर्वसामान्य जनतेला परवडणारी नसून ती तात्काळ थांबविण्याबाबत लक्ष वेधूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली घेतली नाही. त्यामुळे रक्तासारख्या महत्वाचा विषयाबद्दल शासन संवेदनशील नसल्याचे दिसून आल्यानेच या रक्तपिशवी दरवाढी विरोधात राज्य शासनासह संबंधित प्रशासनाला जाग आणण्यासाठीच हे ‘रक्तदान आंदोलन’ छेडणार येणार होते.
दरम्यान पोलिसांनी युवा रक्तदाता संघटनेला नोटिस बजावत मनाई आदेश असताना आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्रमनाई आदेश उठेपर्यंत दरवाढ रद्द झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन जिल्हाभरात छेडण्याचा इशारा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.यावेळी गौतम माठेकर, अर्चित पोकळे, सुरज मठकर आदी युवा रक्तदाता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.