You are currently viewing आयुष्याचा सूर..

आयुष्याचा सूर..

*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री सौ.कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आयुष्याचा सूर..!*

किती पाहू लोचनांनी
तुझ्या रूपाचं चांदण
उजळलं तुझ्यामध्ये
माझ्या मनाचं अंगण

अशी जादू केलीस तू
कोमेजल्या मनावर
मला पडला त्यामुळे
साऱ्या जगाचा विसर

माझे लक्ष नाही लागे
आता माझ्या कामावर
सारे जग मला दिसे
फक्त तुझ्या रूपावर

माझ्या मनाचा अंधार
तुझ्या रुपात विरला
नव्या आयुष्याचा सूर
मला त्यात गवसला

सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक

 

*👉मोफत समुपदेशन….मोफत समुपदेशन …*

*”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने*

*” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी*

🔹रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी, यांच्या वतीने *_”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने “_* १२ वी नंतर विविध क्षेत्रातील सुवर्ण संधींवर मार्गदर्शन हा मोफत समुपदेशन कार्यक्रम *_शुक्रवार , दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:००_* या वेळेत *मराठा भवन मंगल कार्यालय* ,जिल्हा परिषदे जवळ , रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे .

*प्रमुख वक्ते :प्रा .विजय नवले (करिअर पाथ निर्मिती मध्ये विश्वविक्रम करणारे तज्ञ )*

🔹या कार्यक्रमासाठी मोफत नाव नोंदणी खालील गुगल फॉर्म लिंक द्वारे करावी .

https://forms.gle/Sv7pZYtT9X1Lw2F18

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*
*कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वूमेन*

*📲संपर्क क्रमांक :*

*९४२०२७४११९*
*७९७२९९७५६७*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा