You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील साटेली, तळवणे खनिज उत्खनन प्रकरणी राजकीय लोकप्रतिनिधी आंदोलनाच्या पावित्र्यात

सावंतवाडी तालुक्यातील साटेली, तळवणे खनिज उत्खनन प्रकरणी राजकीय लोकप्रतिनिधी आंदोलनाच्या पावित्र्यात

*सावंतवाडी तालुक्यातील साटेली, तलवणे खनिज उत्खनन प्रकरणी राजकीय लोकप्रतिनिधी आंदोलनाच्या पावित्र्यात*

*मार्च एंडिंग येऊनही डंपर मालकांची थकली पेमेंट*

सावंतवाडी तालुक्यातील साटेली मायनिंग गेली काही वर्षे जोरदार सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच डंपर मालकांना खनिज वाहतुकीमधून आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत मिळत होता. परंतु गेले काही महिने साटेली, तळवने खनिज वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून खनिज वाहतूकदार डंपर चालक मालकांना वाहतुकीसाठी भाड्यापोटी मिळणारी रक्कम न मिळाल्याने कित्येक डंपर चालक मालक आर्थिक संकटात सापडले आहेत.
खनिज वाहतुकीसाठी अनेकांनी बँकेकडून, फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन डंपर घेतले. डंपर वर लागणारे चालक, येण्यारा डागडुजी खर्च, डिझेल इत्यादीसाठी नेहमीच पैसे आवश्यक असतात. त्याचबरोबर डंपरचा दर महिन्याचा हप्ता व्याजासहित हजारो रुपयांमध्ये बँकेला भरावा लागतो. एक दोन हप्ते थकीत झाल्यास बँकेकडून चक्रवाढ व्याज आकारले जाते आणि मोठी रक्कम थकीत झाल्यास मार्च एंडिंग येताच बँक वसुलीसाठी डंपर मालकांकडे तगादा लावते. साटेली मायनिंगमध्ये खनिज उत्खनन आणि वाहतुकीसाठी स्थानिकांनी आपले डंपर भाड्याने लावले आहेत, परंतु मार्च एंडिंग तोंडावर आलेले असतानाही सदरच्या वाहतूकदार कंपनीकडून खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर चालक मालकांना भाड्यापोटी अदा करावयाची रक्कम न दिल्याने बँकेचे हप्ते कसे भरायचे? याच विवंचनेत अनेक डंपर मारलं अडकले आहेत. काही जणांनी हफ्ते न भरल्यास बँक डंपर जप्त करेल, लिलाव होईल आणि त्यानंतर आपल्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहील या भीतीपोटी घरातील दागदागिने, अगदी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील गहाण ठेवून बँकेचे हप्ते भरले आहेत. दिवसेंदिवस रोजगाराचा प्रश्न गंभीर बनत चाललेला असताना निदान आपल्या कुटुंबाच्या दोन वेळच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी याकरिता अनेकांनी कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन डंपर घेतले. परंतु कोणत्याही कंपनीकडे वाहतुकीसाठी डंपर लावले असता डंपरचे पेमेंट वर्षानुवर्षे रखडतच असल्याचे दिसून येते.
डंपरसाठी घेतलेले कर्ज हे लखोंमध्ये असून हप्ता देखील तसाच हजारोंचा आहे. त्यामुळे केवळ दागिने विकून तात्पुरती सोय होईल परंतु कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर कंपनीकडून थकीत रक्कम अदा होणे अत्यंत आवश्यक आहे. एकूण सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन डंपर मालकांच्या पाठीशी राजकीय पक्ष उभा राहिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. राज्यातील सत्तेतून पायउतार झालेल्या एका पक्षाची थकीत भाडे वसुली संदर्भात आज मीटिंग झाली असून राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समोर येत आहे. योग्य वेळी कंपनीने यावर तोडगा न काढल्यास भविष्यात साटेली खनिज उत्खनन आणि वाहतूक बंद पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा