“युवा संवाद भारत @ 2047″ या कार्यक्रमाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी,
“अमृत महोत्सव कालच्या काळातील भारत @ 2047 ची झलक” या संदर्भात, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय आणि त्यांची स्वायत संस्था नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) 1 मे ते 30 जून 2023 या कालावधीत जिल्हयांमध्ये समुदाय आधारित संस्था (CBO) च्या मदतीने “युवा संवाद भारत @ 2047″ या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. यासाठी 31 मार्च पर्यंत निकष पूर्ण करणारे इच्छुक CBOS, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गनगरी येथून अर्ज प्राप्त करू शकतात, अधिक माहितीसाठी NYK ऑफिस येथे संपर्क साधावा किंवा anyksindhudurg@gmail.com वर ईमेल किंवा 9176093429 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा नेहरु केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
जे पंच प्राण वर चर्चा करतील आणि त्यानंतर किमान 500 तरुणांच्या सहभागासह प्रश्नोतरे एक सत्र होईल, आयोजक CBO ला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रु.20,000 पर्यंत प्रतिपूर्ती केली जाईल. ज्या CBOS अर्ज करू इच्छितात त्याचा गैर-राजकीय पक्षपाती नसलेला इतिहास असणे.आवश्यक आहे आणि युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुरेसे संघटनात्मक बळ असायला हवे. संस्था विरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त 3 सीबीओ निवडले जातील.
जिल्ह्याच्या विविध CBOS (समुदाय आधारित संस्था) च्या मदतीने आणि सहाय्याने जिल्हा स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे, जे पंच प्राण अनुरूप देश च्या भविष्य आणि सकारात्मक संवाद निर्माण करण्यासाठी, जिल्हा एन. वाय. के. सोबत हात मिळवणी करतील अशी माननीय पंतप्रधान यांची संकल्पना होती. हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरुपात आयोजित केला जाईल, ज्यामध्ये तज्ज्ञ ,जाणकार व्यक्ती असतील.