*आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सांगुळवाडी निमअरुळे, अरुळे, सडुरे मुख्य रस्ता दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यावधी निधी मंजूर*
*भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या मागणीला यश*
*नवलराज काळे यांनी आमदार नितेश राणे यांच्यासहित केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने मानले जाहीर आभार*
*वैभववाडी-* राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर प्रथमताच 06 जुलै 2022 रोजी वैभववाडी तालुका तहसील कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध विभागाच्या कामाबाबत आढावा बैठक पार पडलेल्या बैठकीत भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सडूरे शिराळे श्री नवलराज काळे यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातून शहराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधले होते. यामध्ये प्रामुख्याने वैभववाडी ते सडूरे रस्त्याच्या दूर अवस्थेबाबत सदर सभागृहात लक्ष वेधले होते. त्यावर आमदार नितेश राणे यांनी सडूरे शिराळे रस्ता दुरुस्तीबाबत योग्य प्रस्ताव व इस्टिमेट करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना सभागृहात दिल्या होत्या त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात आल्या.
सदर आढावा बैठकीनंतर पहिल्यांदाच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार नितेश राणे यांनी सदर कामाचा पाठपुरावा करत केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत कोट्यावधीचा निधी या रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर करून आणला आहे. 08 मार्च 2023 रोजी ग्रामविकास विभागाच्या आदेशान्वये *सांगुळवाडी निमअरुळे, अरुळे, सडुरे रस्ता इजिमा 10-4.100 किमी साठी 3 कोटी 24 लाख 10 हजार* अश्या कोट्यावधी निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. अशाप्रकारे तालुक्यातील इतर कामांना देखील आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे.
सदर रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी कोठ्यावधी निधी मंजूर झाल्यामुळे सडुरे शिराळे सहित अरूळे निमअरूळे सांगुळवाडी गावातील विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिक अशा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.तसेच हा रस्ता दुरुस्ती होत असल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
सदर कामाबाबत कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी सदर रस्ता दुरुस्ती होने कामी कोट्यावधी निधी उपलब्ध करून देण्याकरिता पाठपुरावा केल्याबद्दल तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सदर रस्ता काम मंजूर केल्याबद्दल व वैभववाडी तालुका भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, संबंधित सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी यांनी सदर रस्ता दुरुस्ती होने कामी सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केल्याबद्दल पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने जिल्हाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी तथा सडूरे शिराळे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य नवलराज काळे यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*