*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार गायक संगीतकार श्री.अरुण गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*
*”श्री गिरनार तीर्थक्षेत्राची काव्यमय महती”*
श्री गिरनारी गिरनारी करू तुज वंदन
गुरुदत्तांचे अखंड वास्तव्य पवित्र स्थान!!ध्रु!!
नारदाला सांगितली महती ब्रह्मदेवानं
गिरनार पर्वत चढता होई पाप नाशन
तिर्थक्षेत्री बहु सिद्धांनी केली सिद्धी प्राप्त!!1!!
आधी घ्यावे वस्त्रपाथेश्वर देवाचे दर्शन
मनुष्य होईल मुक्त पंच महादोषांतून
मिळे आरोग्य सुख संपदा जाऊया शरण!!2!!
गजपादाने भूजल काढले येथे स्वपाऊलानं गंगेला पाचारीले स्थापित केले इंद्रानं
होई पापमुक्त करिता स्नान जलप्राशन!!3!!
भिमेश्वराची करावी पूजा भीम कुंडा स्नान
भीमानं पाणी काढले येथे पाताळ भेदून
सिद्धनाथ पादुकांचे घ्यावे येथे दर्शन!!4!!
गोमुखी गंगा प्रगटली बहु पुण्य स्थान
शेष नागाच्या विनंतीनं आली पाताळांतून
सुरार्क भैरवास पूजावे होती कामना पूर्ण!!5!!
विष्णू अवताराच्या पादुकांचे करावे पूजन
अंबाजीचे करावे पूजन मिळे मार्गदर्शन
गोरक्षनाथ देवादि ऋषींचे घडे दर्शन!!6!!
गुरुदत्त पादुकांचे शिखरां घ्यावे दर्शन
साक्षात ब्रह्मा विष्णू महेश येथे विराजमान
पाहुनी मिळे आत्मशांती तृप्ती समाधान!!7!!
गिरनार उत्तमोत्तम शिखर होय अनन्य
येथे कमंडलु कुंड दत्ताग्नी धूना अखंड
सांगता होई मिळे प्रसाद संतोषती जन !!8!!
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.