You are currently viewing मालवणात भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचा भव्यदिव्य शुभारंभ

मालवणात भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचा भव्यदिव्य शुभारंभ

*आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मालवण शहरात काढण्यात आली रॅली*

 

*खासदार विनायक राऊत यांनीही स्पर्धेला दिल्या शुभेच्छा*

 

मालवण :

 

मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लाखो रुपये पारितोषिक रक्कमेच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या भव्य स्वरूपातील डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे १५ ते १९ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटना निमित्ताने आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मालवण शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.उमेश मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून देऊळवाडा येथून मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ सायंकाळी झाला. शहरातून भव्यदिव्य रॅली बोर्डिंग मैदानावर दाखल झाली.

आमदार वैभव नाईक व मुंबईचे माजी नगरसेवक बेस्ट समिती चेअरमन अनिल पाटणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी फलंदाजी करत फटकेबाजी केली. दरम्यान खासदार विनायक राऊत यांनीही क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला.

या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले आहेत.नामवंत आणि दिग्गज क्रिकेटपटू यांचा सहभाग स्पर्धेत आहे. स्पर्धेतील विजेत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक व ३ लाख रु रोख पारितोषिक, उपविजेता संघास भव्य चषक व १ लाख ५० हजार रोख पारितोषिक व वैयक्तिक स्तरावरील अन्य पारितोषिके असणार आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी केली जात आहे.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, बाबा सावंत, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, पंकज सादये, अन्वय प्रभू, किरण वाळके, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, युवतीसेना कुडाळ विधानसभा समन्वयक शिल्पा खोत, संमेश परब, तपस्वी मयेकर, अमित भोगले, विभाग प्रमुख समीर लब्दे, विजय पालव, राजेश गावकर, बंडू चव्हाण, कमलाकर गावडे, प्रवीण लुडबे, भाऊ चव्हण, रश्मीन रोघे, भाई कासवकर, आशु मयेकर,दर्शन म्हाडगुत, बाबू टेंबुलकर,विनायक परब,अक्षय रेवंडकर, उमेश चव्हाण, मनोज मोंडकर, यशवंत गावकर, महेश जावकर, उमेश मांजरेकर सिद्धेश मांजरेकर, म.तालुका संघटक श्वेता सावंत व दीपा शिंदे, शहर प्रमुख रश्मी परुळेकर, तालुका समन्व्यक पूनम चव्हाण, युवतीसेना निनाक्षी शिंदे, सोमनाथ माळकर, नरेश हुले, स्वप्नील आचरेकर, नंदू गावंडी तृप्ती मयेकर, आर्या गावकर, किशोर गावकर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा