You are currently viewing डेगवे गावात एटीएम सुरू करण्याबाबत शाखा व्यवस्थापकांना पत्र व्यवहार – उल्हास देसाई

डेगवे गावात एटीएम सुरू करण्याबाबत शाखा व्यवस्थापकांना पत्र व्यवहार – उल्हास देसाई

बांदा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ‘डेगवे’ गाव बांदा दोडामार्ग, गोवा या प्रमुख रस्त्यावर आहे. या गावात ग्रामपंचायत, पोष्ट आँफीस, तलाठी कार्यलय, श्री.स्थापेश्वर वि.का.स.सेवा सोसायटी, जि.प.प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, साँमिल, श्री माऊली मंदिर, ४८ खेड्यांचे श्री.स्थापेश्वर मंदिर, विविध किराणा मालाची दुकाने, वाचनालय, विविध छोटे मोठे व्यवसाय, करणारे लोक आहेत.
या गावातील सैन्यदलातून सेवा निवृत्त झालेले, शिवाय इतर शासकीय नोकरी करणारे व सेवानिवृत्त झालेले पेन्शन घेणारे जेष्ठ ग्रामस्थ आहेत. शिवाय खाजगी काम करणारे ग्रामस्थ, शेतकरी आहेत. वयोवृद्ध जेष्ठ ग्रामस्थांना व इतर लोकांना बांदा येथे मुद्दाम पैसे काढण्यासाठी जावे लागते. शिवाय या गावात अलीकडेच मोबाईल टाँवर बांधला आहे. तरी या गावात एटीएम (atm)सेवा उपलब्ध करून दिल्यास त्याचा ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे वाटते. शिवाय पडवे, माजगांव, मोरगाव, आडाळी, कळणे, तांबुळी, असनये, भालावल वैगेरे दशक्रोशीतील गांवाना त्याचा लाभ होईल. बांदा या ठिकाणी बाजाराच्या दिवशी अंरुद रस्त्यावर मोटार सायकल व अन्य वहाना मुळे ट्राफिक जास्त होते. त्यामुळे लोकांना गर्दीचा त्रास कमी होईल. असे मला वाटते.
तरी याबाबत आपण कृपया सहानुभूती पुर्वक विचार करून संबंधितांना कळवावे अशी आग्रहाची विनंती
उल्हास बाबाजी देसाई, सरचिटणीस, डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबई. यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा