You are currently viewing रिलायन्स फाउंडेशनची सागरी हवामानाची माहिती मासेमारांना उपयुक्त..

रिलायन्स फाउंडेशनची सागरी हवामानाची माहिती मासेमारांना उपयुक्त..

रत्नागिरी

बाहेरून शांत भासणारा समुद्र कधी कधी अत्यंत रौद्र रूप धारण करतो.उदरनिर्वाहाच साधन म्हणून मासेमारी करणारे मासेमार बांधव सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात. लहान बोट व कमी मनुष्यबळ आणि बोट जास्त काळ समुद्रात राहील अशी यंत्रणा नसल्याने हे मासेमार सर्रास सागरी अपघातांना बळी पडतात.

रिलायन्स फाऊंडेशनची माहिती प्रसारित करण्याचं तुमचं सामाजिक कार्य कशामुळे सुरू झालं या प्रश्नाच उत्तर देताना अतिशय भावूक मनाने अमित डोर्लेकर सांगतात ,’’माझा जन्म मासेमार कुटुंबात झाला त्यामुळे या व्यवसायातील चांगले वाईट प्रसंग माझ्या देखील वाटणीला आलेत.

पूर्णगड, रत्नागिरी येथे राहणारे २६ वर्षीय अमित भरत डोर्लेकर यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मासेमारी हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या करत आहेत. अमित हे भरत डोर्लेकर यांचे थोरले पुत्र आहेत. पिता व पुत्र दोन्ही पण मासेमारी व्यवसायाशी रिलायन्स फाउंडेशनच्या महितीचा उपयोग करतात. मच्छिमार बांधवांना मदत करण्यास ते सदैव तत्पर असतात. २०१८ साली रिलायन्स फाऊंडेशनच्या अधिकार्‍यांशी काही कामानिमित्त अमित यांची भेट झाली. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना येणार्‍या समस्यांची चर्चा झाल्यावर त्यांनी त्यांच्या जवळील अन्य मासेमार्‍यांचे संपर्क क्रमांक रिलायन्स फाऊंडेशनच्या सेवेशी जोडण्यासाठी दिले. त्याचबरोबर ते स्वतः रिलायन्स फाऊंडेशनच्या सागरी हवामानाच्या whatsapp ग्रुप व ध्वनि संदेशाशी जोडले गेले.

अमित डोर्लेकर रिलायन्स फाऊंडेशनच्या सागरी हवामान सेवेसोबत २ वर्षापूर्वी जोडले गेले. रिलायन्स फाऊंडेशन कडून माहिती मिळवायला सुरवात केल्यावर या महितीचा आणि प्रत्यक्ष समुद्रातील परिस्थितीचा ताळमेळ लावून ही उपयुक्त माहिती इतर मासेमार्‍याना पुरवण्यास सुरवात केली. रिलायन्स फाऊंडेशनकडून मिळणारी हवामानाची माहिती व हवामानाची माहिती मिळवण्यापूर्वीचा मासेमारी व्यवसाय यातला फरक सांगताना अमित म्हणतात,’’आमचे आयुष्य समुद्रात मासेमारी करण्यात गेले. लहान वयातच कुटुंबातील इतर सदस्यांच्या सोबत मासेमारीसाठी जाण्यास सुरवात केली. त्यावेळेस सागर हवामानाची माहिती देणारी कोणतीच यंत्रणा नव्हती तरी सुद्धा अनुभवणे हवामांचा अंदाज लावत जीव मुठीत घेऊन मासेमारी करत असू. कित्येक वेळा अंदाज चुकल्याने धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. रिलायन्स फाऊंडेशनकडून माहिती मिळायला लागल्यापासून आम्ही एक दिवस आधीच समुद्रामध्ये जायचं की नाही याचा निर्णय घेऊ लागलो.संभाव्य धोके टाळणे शक्य झाले. ज्या मासेमार्‍याना इंटरनेट किंवा मोबाइल चांगल्या पद्धतीने हाताळता येत नाही अश्यांसाठी तंत्रद्यानाच्या माध्यमातून रिलायन्स फाऊंडेशनकडून मिळणारी माहिती उपयुक्त ठरत आहे.

रिलायन्स फाऊंडेशनकडून वार्‍याचा वेग जास्त आहे किंवा हवामानाची परिस्थिति कधीही बदलू शकते अशी माहिती मिळते तेव्हा आम्ही मासेमारीसाठी जात नाही त्यामुळे आमचा वेळ,श्रम आणि जीवन तसेच अत्यंत महत्त्वाचे इंधन बचत होते. वार्‍याचा वेग अचानक बदलला तर बोट अर्ध्या मार्गातून परत घ्यावी लागते त्यामुळे डीझेलच नुकसान होत. गेल्या वर्षी अंदाजे १ ब्यारेल डीसेल ची बचत ही रिलायन्स फाउंडेशनच्या सागरी हवामानाच्या महितीमुळे झाली . प्रती बॅरल डिझेल ची किमत साधारणतः १८,००० ते २०,००० इतकी असते.

रिलायन्स फाऊंडेशन व INCOIS यांचे आभार मानून ही सेवा अशीच अविरत चालू ठेवावी,अशी विनंती अमित डोर्लेकर यांनी केली

प्रतिक्रिया व्यक्त करा