कणकवली
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट येथील पत्रकार संजना हळदिवे यांचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना सौ. हळदीवे म्हणाल्या सर्वप्रथम महिला भगिनींना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.आजचा हा दिवस महिला विषयी सन्मान आदर प्रेम व्यक्त करणे हा महिला दिनाचा हेतू आहे. ८ मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो स्त्री कामगारांनी रूटझज चौकात ऐतिहासिक निदर्शने केली म्हणून या दिवशी खरी सुरुवात झाली.
आज स्त्री सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले आहे, म्हणूनच महिला मागे न राहता पुढे आल्या पाहिजेत.आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार क्षेत्रात महिला भगिनी भरपूर प्रमाणात कमी आहेत. आजच्या काळात महिला सुशिक्षित व शिकलेले आहेत, त्यांनी या क्षेत्रात पुढे येऊन समाजातील अन्यायाला वाचा फोडली पाहिजे व जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठी न्यूज चॅनल सुरू करणारी मी पहिली महिला आहे अशाप्रकारे बाकीच्या महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आले पाहिजे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता कुमुदीनी प्रभू, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, माजी पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे, सरपंच संजना आग्रेंं, उपसरपंच तन्वी मोदी आदी उपस्थित होतेे.
यावेळी स्नेहलता राणे, तन्वी पवार यांचा ही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पाककला स्पर्धा तसेच महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.