You are currently viewing वराड गावात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शुभारंभ.. 

वराड गावात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शुभारंभ.. 

भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती..

मालवण :

 

मालवण तालुक्यातील जिल्हा वार्षिक योजनेतून वराड गावात मंजूर झालेल्या ६ विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच शलाका रावले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.

केंद्रियमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या वराड गावातील सावरवाड वराड मुख्य रस्ता डांबरीकरण, वराड वावुळवाडी रस्ता डांबरीकरण, वराड म्हावळुंगेवाडी रस्ता डांबरीकरण, वराड कट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता डांबरीकरण, पालववाडी विजय पालव यांच्या घरात जाणारा रस्ता डांबरीकरण, वराडशेटयेवाडी स्मशानभूमी शेड बांधणे आदी सहा कामांची भूमिपूजन झाली. ही कामे मंजूर होताना वरिष्ठांच्या मार्गर्शनाखाली माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला.

 

भूमिपूजन वेळी जिप माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सौ. सरपंच शलाका रावले, उपसरपंच गोपाळ परब, ग्राप सदस्य यासह बबन पांचाळ, शक्ती केंद्र प्रमुख राजन माणगांवकर यासह भाजप पदाधिकारी युवमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, हरेश गांवकर, नारायण लुडबे, भाजप वराड सोशल मीडिया प्रमुख निखिल घोगळे तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

गेले कित्येक वर्षे आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून वराड गावात जेवढा निधी आला नाही. त्यापेक्षा जास्त निधी केवळ सहा महीन्यात भाजप युती सरकारच्या माध्यमातून भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वराड आला आहे. गावातील उर्वरित विकासकामांचा पाठपुरावा करून ती कामेही निलेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावणार अशी माहिती संतोष साटविलकर व राजन माणगांवकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा