देवगड :
देवगड शहरातील मांजरेकर नाका ते कुणकेश्वर मंदिर या रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण या कामासाठी आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकारने ९ कोटी ६० लाख रुपये अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत.
त्यातील सुमारे दीड कोटी रुपये या वर्षात देण्यात आले आहेत. आम.नितेश राणे यांच्या शिफारसीनुसार हा निधी अर्थसंकल्पात समावेशित करण्यात आला आहे. देवगड शहरातून मीठमुंबरी तारामुंबरी पुलावरून कुणकेश्वर कडे मोठ्या प्रमाणात ट्राफिक असते, बऱ्याच ठिकाणी हा रस्ता गैरसोयीचा होत आहे.
यंदाच्या वर्षी कुणकेश्वर यात्रेनिमित्त आम. नितेश राणे यांनी पाठपुरावा केल्याने रस्त्याचे खड्डे बुजवले गेले. मात्र आमदार नितेश राणे यांनी या रस्त्यासाठी श्रेणी वाढ मागितली होती. यासाठी स्वतंत्र शासनादेश काढून या रस्त्याला उन्नत दर्जा देण्यात आला. या रस्त्यासाठी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ९ कोटी ६० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मांजरेकर नाका ते तारामुंबरी नाका रुंदीकरणाचाही समावेश आहे. तसेच इतर ठिकाणी रुंदीकरण रस्ता सुधार व डांबरीकरण या प्रकारे ही कामे केली जाणार आहेत. आम. नितेश राणे यांच्या या कामगिरीबद्दल देवगड तालुक्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे.